शिवसेनेचा उमेदवार कोण? औटी यांच्या पत्नी व मुलालाही राजकारणाचा अनुभव

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष व माजी आमदार विजय औटी यांनी आपण विधान सभेची निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर वक्तव्ये नुकतेच केले आहे.
Vijay auti 2.jpg
Vijay auti 2.jpg

पारनेर : विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी (Vijay Auti) यांच्या पत्नी जयश्री औटी या पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत. तसेच चिरंजीव अनिकेत औटी हे सुद्धा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष होते. दोघांनाही राजकारणाचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे त्यामुळे औटी स्वतः जरी उमेद्वारी करणार नसले, तरीही त्यांच्या घरातील कोणीही उमेद्वार कदाचित असू शकतो, हे मात्र नाकारता येणार नाही. (Who is the candidate of Shiv Sena? Auti's wife and son also have experience in politics)

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष व माजी आमदार विजय औटी यांनी आपण विधान सभेची निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर वक्तव्ये नुकतेच केले आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे उमेदवार कोण व विद्यामान आमदार निलेश लंके यांच्या विरोधात कोण कोण उभे असणार या चर्चेला निवडणुकीस खूप अवधी असला तरीही  तालुक्यात उधाण आले आहे.

औटी यांनी एका कार्यक्रमात हे वक्तव्य केल्याने चर्चा सुरू झाली आहे. मात्र आता औटी हे स्वतः उभे राहाणार नसले, तरीही त्यांच्या घरातील उमेद्वार असणार नाही, असे मात्र औटी यांनी म्हटले नाही. त्यामुळे त्यांच्या घरातील इतर कोणीही उमेद्वार असू शकतो, हे नाकारता येणार नाही. औटी यांनी त्यांच्या कार्यकाळात आणलेली व मंजूर झालेल्या कामाच्या भूमिपुजनाचा सध्या सपाटा लावला आहे. मध्यांतरी कोरोना काळात तालुक्यात फारसे बाहेर न पडणारे औटी आता दररोज विविध उदघाटनाच्या व कार्यक्रमांच्या निमित्ताने जनतेत येताना दिसत आहेत. 

काशिनाथ दातेंनीही संपर्क वाढविला

या शिवाय शिवसेनेचे व कट्टर औटी समर्थक जिल्हा परीषदेचे विद्यामान कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते हे सुद्धा भविष्यात विधानसभेच्या उमेद्वारीचे दावेदार ठरू शकतात. कारण सध्या ते आपल्या सभापती पदाच्या माझ्यमातून जिल्हा परिषदेतून मोठा निधी तालुक्यातील विविध गावातील विकास कामांसाठी आणत आहेत. त्या कामांचे उदघाटनेही सध्या जोरात सुरू आहेत. तसेच विद्यमान पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके हे सुद्धा औटी यांच्या समावेत आहेत. त्यांचाही सभापती या नात्याने तालुक्यात चांगलाच जनसंपर्क  वाढला आहे. ते सुद्धा दावेदार ठरू शकतात.

ऐन वेळी शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास भोसले हे सुद्धा उमेद्वारीसाठी इच्छूक असू शकतात, मात्र आद्याप विधानसभेच्या निवडणुकीसाठी खूप कालावधी असल्याने आताच याबाबत चित्र स्पष्ट होणे शक्य नाही. 

आगामी निवडणुकीत आघाडीनुसार उमेदवार

विधानसभेच्या निवडणुकीस खूप अवधी आहे. आताच त्याबाबत काही बोलणे संयुक्तिक नाही. पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, यावर बऱ्याच गोष्टी आवलंबून आहेत. कोणत्या पक्षाशी युती किंवा आघाडी होणार, यावर उमेद्वारी आवलंबून राहणार आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेनेचा कोण उमेदवार असणार, याबाबत आताच मत प्रदर्शन करणे योग्य होणार नाही, असे मत शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांनी व्यक्त केले.

हेही वाचा..

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in