नारायण राणेंनी जयंतरावांसाठी बंद गळ्याचा कोट शिवला तेव्हा..

राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने अनेक जुन्या आठवणींना नेत्यांच्या आणि पत्रकारांच्या गप्पांमध्ये उजाळा मिळतो. अशीच ही आठवण माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि विद्यमानजलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यातील दोस्तीच्या धाग्याची!
नारायण राणेंनी जयंतरावांसाठी बंद गळ्याचा कोट शिवला तेव्हा..
narayan-rane-jyant-patil

मुंबई : विरोधी बाकांवरून तुटून पडताना सत्ताधाऱ्यांना नाकीनऊ आणणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांचा राजकारणापलीकडचा 'दोस्ताना' मात्र साऱ्याच राजकारण्यांना (सत्ताधारी-विरोधकांना) हवाहवासा वाटण्यासारखा आहे. राज्यातील प्रत्येक वेळी अर्थसंकल्प मांडत असताना राणे यांनी जयंतरावांना दिलेल्या भेटीची चर्चा विधीमंडळ आवारात जुन्याजाणत्या नेत्यांमध्ये आणि पत्रकारांमध्ये होतेच.

युतीच्या काळातील नऊ महिन्यांच्या मुख्यमंत्रीपदावर असताना राणेंनी यांनी आपलै मैत्रीचे वर्तुळ विस्तारले. विधीमंडळात आणि त्याबाहेरही पक्की वैचारिक मांडणी करणाऱ्या अगदी विरोधकांशीही त्यांनी राजकीय आणि वैचारिक खुलेपणाने मैत्री जपली. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर.आर. पाटील आणि मंत्री जयंत पाटील हे राणेंचे खास मित्र.

मंबईबाहेरील म्हणजे, आपल्या मतदारसंघातून आल्यानंतर राणे प्रत्येक आमदार-मंत्र्यांचा मुंबईत छान पाहणचार करण्याची राणे यांची खासियत अनेकांना आठवणारी आहे.  मुख्यमंत्रीपद गेल्यावरही राणेंनी आपल्या सस्नेह अतिथ्यशीलता जपली.

 शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता 1999 सत्तेतून पायउतार झाल्यानंतर राणेंचे मुख्यमंत्रिपद गेले. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्रीमंडळ स्थापन झाले. राणे हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते बनले. सत्तास्थापनेसाठी तेव्हा बरीच खडाखडी युती आणि आघाडीत झाली होती. त्यामुळे एक प्रकारचा ताण सत्ताधारी आणि विरोधकांवर असायचा. राणेंची एखादी कृती हा ताण सैल करायची.

जयंत पाटील हे 1999 मध्ये अर्थमंत्री बनले. २००२-३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची लगबग सुरू होती. जयंतराव हे अर्थसंकल्प मांडणार त्याच्या आधीच्या दिवशी राणेंनी पाटलांना फोन केला आणि विचारले 'जयंतराव, उद्या बजेट मांडणार आहात ? कोणता ड्रेस घालणार?' त्यावर पाटलांनी उत्तर दिले आणि म्हणाले, "रोजच्यासारखाच पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि तशीच फॅंट!`

बजेटच्या दिवशी आपल्या मित्राने जयंतरावांनी चांगला ड्रेस म्हणजे, सुटाबुटात यावे, अशी अपेक्षा असलेल्या राणेंना जयंतरावांचा नियोजित ड्रेस आवडला नाही. त्यांनी पुन्हा जयंतरावांना फोन करून कुठे आहात ? असे विचारले आणि त्यांच्या 'पीएचाही मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर लगेचच 'पीए शी बोलून राणेंनी जयंतरावांचा राहण्याचा पत्ताही घेतला. त्यानंतर काही मिनिटांतच जयंतराव राहात असलेल्या ठिकाणी राणेंनी 'गाना' तील टेलरला पाठविले आणि जयंतरावांच्या कपड्यांचे माप घेतले. त्यानंतर जेमतम पाच-सहा तासांतच जयंत जयंतरावांना काळ्या रंगाचा आणि बंद गळ्याचा ड्रेस पाठविला. अशाच प्रकारे राणेंनी आर. आर. पाटलांनाही याच दुकानातून खास ड्रेस शिवून घेतला होता, 'ब्लेझर'चा आग्रह करूनही आबांनी आपल्यासाठी क्रीम कलरचा सफारी ड्रेस निवडला होता. राणे आणि खासदार असल्याने ते विधीमंडळात नसले तरी, त्यांच्या अनेक आठवणी विधीमंडळात विशेषतः अधिवेशनात रंगतात. त्यातीलच हा प्रसंग.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in