मुख्यमंत्र्यांचा अपमान सहन करणार नाही 

माझं आमदार दिलीप मोहिते आणि दिलीप वळसे पाटील यांच्याशी वैयक्तीक भांडण नाही.
We not tolerate insult to Chief Minister Uddhav Thackeray : Shivajirao Adhalrao Patil
We not tolerate insult to Chief Minister Uddhav Thackeray : Shivajirao Adhalrao Patil

घोडेगाव (जि. पुणे) : महाविकास आघाडी ही राज्यात आहे, तशीच आंबेगाव तालुक्यात पण हवी. आंबेगाव तालुक्यात त्यांच्या (राष्ट्रवादीच्या) तालुकाध्यक्षांचा फोटो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोटोपेक्षा मोठा असतो. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या कामांना खो घातला जातो, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा झालेला अपमान आम्ही सहन करणार नाही, असा इशारा शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला नाव न घेता दिला. (We not tolerate insult to Chief Minister Uddhav Thackeray : Shivajirao Adhalrao Patil)

शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान आंबेगाव तालुक्यात राबविण्यात येत आहे. तालुक्यातील घोडेगाव येथील कार्यक्रमात आढळराव बोलत होते.

ते म्हणाले की उद्दाम आणि उद्धट आमदारांच्या नादी लागू शकतो. कारण आपण लोकांच्या भावन घेऊन त्यांच्याशी लढतोय. माझं आमदार दिलीप मोहिते आणि दिलीप वळसे पाटील यांच्याशी वैयक्तीक भांडण नाही. जी जनता १७ वर्षे माझ्या पाठीशी उभी राहिली, त्यांचे ऋण फेडण्यासाठी आणि त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी मी प्रयत्न करत राहणार आहे. आगामी २०२४ मध्ये मी खासदार झालो नाही; म्हणून माझे सर्व काही संपले असेही काही होत नाही. पराभूत होऊनही मला जनतेचे प्रेम मिळाले. त्यामुळे मी उद्याची चिंता करत नाही. पक्षप्रमुख आणि परमेश्वर आम्हाला जो काही न्याय द्यायचा आहे, ते देतील.

आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय कामे केली आहेत, हे शिवसैनिकांनी घरोघरी जाऊन सांगितले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. पण, त्यांनी कोणावरही प्रतिहल्ला केला नाही. आपण भले आणि आपले काम भले, असे त्यांनी काम केले आहे. आज त्यांना आपल्याला ताकद द्यायची आहे. लोकांच्या कुबड्या किती दिवस घेऊन आपण फिरणार आहोत. कधीतरी आपल्याला स्वतःच्या ताकदीवर मंत्रालयावर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे, अशा शब्दांत आढळराव यांनी शिवसैनिकांना प्रोत्साहन दिले.

या वेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख अरूण गिरे, शिवसेना जिल्हा परिषदेतील गटनेते देविदास दरेकर, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, सुरेश भोर, राजाराम बाणखेले, विजय आढारी, राजाभाऊ काळे, मिलींद काळे, विजय घोडेकर, भाऊसाहेब पाटील, उल्हास काळे, मनोज काळे व शिवसैनिक उपस्थित होते.  या वेळी अरूण गिरे, देविदास दरेकर यांनी आपले मत मांडले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in