नाशिकमध्ये आभासी विकासाची ‘इलेक्शन डिप्लोमसी’?

पंचवार्षिक महापालिका निवडणुका जवळ येऊन ठेपल्याने आता सिडकोवासीयांसाठी विकासकामांची जणू काही लॉटरीच लागली की काय, अशा प्रकारचे चित्र बघायला मिळत आहे. मागील पाच वर्षांपासून सिडको परिसरात एकही नाव घेण्याजोगे नवीन विकासकाम पूर्ण झाले नाही.
BJP NMC
BJP NMC

नाशिक : पंचवार्षिक महापालिका निवडणुका जवळ येऊन ठेपल्याने (NMC election will held in March 22) आता सिडकोवासीयांसाठी विकासकामांची जणू काही लॉटरीच लागली की काय, अशा प्रकारचे चित्र बघायला मिळत आहे. (Now political acitivits, Corporators drawing a picture of devolopment works) मागील पाच वर्षांपासून सिडको परिसरात एकही नाव घेण्याजोगे नवीन विकासकाम पूर्ण झाले नाही. मात्र निवडणूक जवळ आल्याने कोरोना काळातील `आभासी` उपक्रमांची (Virtual activity is on) रेलचेल सुरु झाल्याने तो नागरिकांत चर्चेचा विषय बनला आहे. 

सिडकोवासीयांसाठी ही एक खेदाची बाबच म्हणावी लागेल; परंतु महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक जसजशी जवळ येऊन ठेपत आहे तसतसे एक-एक राजकीय पक्ष विकासकामांच्या घोषणा करताना दिसून येत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने का होईना नव्या कामांच्या घोषणा होत असल्याने नागरिकांमध्ये मात्र काहीसे समाधान व्यक्त होत आहे.

दुसरीकडे राजकीय पक्ष व नेत्यांचा हा पॉलिटिकल फंडा नागरिक समजण्याइतके वेडे मात्र नक्कीच नाहीत. सुरवातीला विकासकामांची घोषणा होते. नंतर भूमिपूजन आणि त्यानंतर पाच वर्षांनी त्या कामाचे उद्‌घाटन होते. तोपर्यंत दुसरी पंचवार्षिक निवडणूक लागून जाते. असाच काहीसा वाईट अनुभव आतापर्यंत नागरिकांना आला आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांची ही इलेक्शन डिप्लोमसी न समजण्याइतकी जनता मूर्ख नाही, एवढे मात्र नक्की. खरोखरच विकासकामे करायची असतील तर निवडणूक लागण्याच्या दोन-तीन वर्षे अगोदर का होत नाही, असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.

असा पडतोय घोषणांचा पाऊस!
पावसाचा हंगाम सुरु झाला आहे. मात्र अद्याप पाऊस पडलेला नाही. त्याची उणीव घोषणांचा पाऊस पाडून भरून काढण्याचे कसब नगरसेवकांनी आत्मसात केले आहे. यासंदर्भात नुकत्याच झालेल्या घोषणांवर नजर टाकल्यास त्याची जाणीव होते. या घोषणांमध्ये पांजरपोळ येथे सिडकोचा नवीन प्रोजेक्ट उभारणे, संभाजी स्टेडियम येथील ‘खेलो इंडिया खेलो’ प्रोजेक्ट काही महिन्यांपासून बंद, मात्र  आमदारांचा पेलिकन पार्कच्या १७ एकर जागेत प्रोजेक्ट सुरू. शिवसेना महानगरप्रमुखांनी उड्डाणपुलास नुकतीच मंजुरी मिळवून आणली आहे. सिडकोच्या घरांना ‘फ्री टू लीज होम’ची घोषणा अद्यापही अमलात आली नाही. अंबड पोलिस ठाण्याच्या विभाजनासाठी जागा निश्चित होऊनही ठाणे मंजूर झाले नाही. केमिकल कंपन्यांमधील रसायनयुक्त दूषित पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी सीईटीपी प्रॉजेक्ट सोडाच साधी ड्रेनेज लाइनदेखील नाही. चुंचाळे येथील महापालिका घरकुल योजनेतील काही इमारती अजूनही धूळ खात आहेत
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in