वाहनचालकांना मोठा दिलासा; कागदपत्रांची मुदत संपली तरी काळजी करू नका!

देशभरातील सर्व परिवहन विभागांना महत्वाच्या सुचन्या दिल्या आहेत.
Validity of vehicle documents treated to be valid till 30th September
Validity of vehicle documents treated to be valid till 30th September

नवी दिल्ली : देशात कोरोनाची (Covid-19) पहिली लाट आल्यानंतर दीर्घकाळ लॅाकडाऊन (Lockdown) करण्यात आला. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. ही लाट ओसरल्यानंतर तीन-चार महिन्यांतच दुसऱ्या लाटेचा कहर सुरू झाला. या काळातही देशभरातील बहुतेक राज्यांमध्ये लॅाकडाऊन करण्यात आले. त्यामुळे नागरिकांची अनेक कामे रखडली. वाहनविषयक कामेही करता आली नाहीत. कागदपत्रांची मुदत संपल्याने वाहन चालकांची अडचणी होऊ लागली आहे. त्यामुळे परिवहन कार्यालयांमध्ये गर्दी होत आहे. (Validity of vehicle documents treated to be valid till 30th September)

केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहन चालकांना दिलासा दिला आहे. देशभरातील सर्व परिवहन विभागांना महत्वाच्या सुचन्या दिल्या आहेत. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात लायसन्ससह इतर कागदपत्रांची मुदत संपली असल्यास संबंधितांवर कारवाई न करण्याचे आदेश केंद्राने दिले आहेत. केंद्र सरकारकडून या कागदपत्रांची मुदत वाढवण्यात आली असून आता 30 सप्टेंबरपर्यंत वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. 

वाहन चालक परवाना, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, फिटनेस प्रमाणपत्र अशी विविध कागदपत्रे वाहन चालकांना आवश्यक असतात. पण कोरोनामुळं अनेकवेळा कार्यालये बंद करण्याने त्याचे नुतणीकरण करणे अनेकांना शक्य झाले नाही. त्यामुळे ही कागदपत्रे 30 सप्टेंबरपर्यंत ग्राह्य धरली जाणार आहे. मात्र, यामध्ये प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्राचा (PUC) समावेश करण्यात आलेला नाही. 

कागदपत्रांची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याने परिवहन विभागांनी वाहन चालकांकडून दंड वसुली करू नये. तसेच त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, अशा सुचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. त्यामुळं कागदपत्रांची मुदत संपलेल्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कागदपत्रांना मुदतवाढ देण्याची ही सहावी वेळ आहे. 

दरम्यान, केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालवण्याचा परवाना नसल्यासा पाच हजार रुपये दंड आकारला जातो. तसचे नोंदणी प्रमाणपत्र नसल्यासही वाहनचालकांकडून पाच हजार रुपये वसूल केले जातात. परमिट नसल्यास 10 हजार आणि फिटनेस प्रमाणपत्र नसल्यास दोन ते पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in