अर्बन बॅंक ! गोल्ड व्हॅल्यूअरसह कर्जदारांवर गुन्हा.. तर व्यवस्थापकाची आत्महत्या टळली असती

मागील आठवडयात विषारी औषध घेवून आत्महत्या केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात दाखवलेली तत्परता बँक व्यवस्थापनाने अगोदरच दाखवली असती तर शिंदे यांच्यावर आत्महत्येची वेळ आली नसती.
अर्बन बॅंक ! गोल्ड व्हॅल्यूअरसह कर्जदारांवर गुन्हा.. तर व्यवस्थापकाची आत्महत्या टळली असती
Urban bank.jpg

शेवगाव : राज्यात बहुचर्चीत ठरलेल्या नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत बनावट सोने तारण ठेवून केलेल्या फसवणूक प्रकरणी गोल्ड व्हँल्यूअरसह 159 कर्जदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Urban Bank! Crime on borrowers with gold valuer .. then the suicide of the manager would have been avoided)

याबाबत शेवगाव शाखेचे व्यवस्थापक अनिल वासुमल आहुजा (वय- 54) राहणार खंडोबानगर शेवगाव यांच्या फिर्यादीवरुन गोल्ड व्हँल्युअर विशाल गणेश दहिवाळकर ( राहणार जैन गल्ली शेवगाव) यांच्यासह 159 कर्जदारांवर बनावट सोने तारण ठेवून सुमारे 5 कोटी 30 लाख 13 हजार रुपये कर्ज घेवून बँकेची आर्थिक फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

आहुजा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सन 2017 ते 2021 या कालावधीत संबंधीत गोल्ड व्हँल्यूअर व कर्जदार यांनी वेळोवेळी संगनमत करुन बनावट दागीने खरे असल्याचे दाखवून मुल्यांकन दाखले देवून बँकेकडून कर्ज घेतले. कर्जदारांना वेळोवेळी नोटीसा देवूनही त्यांनी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडून घेतले नाही. म्हणून काही दिवसांपूर्वी नगर येथे बँकेच्या मुख्य शाखेत या पिशव्यातील सोन्यांचा लिलाव ठेवण्यात आला होता. मात्र त्यातील सोने बनावट असल्याचे निष्पन्न झाले होते. वरील चार वर्षाच्या कालावधीत 159 कर्जदारांनी 364 पिशव्यात 27 किलो 351.10 ग्रँम सोने बँकेकडे तारण ठेवून सुमारे 5 कोटी 30 लाख 13 हजार रुपये कर्ज घेतले होते. यामुळे बँकेचे गोल्ड व्हँल्युअर विशाल गणेश दहिवाळकर राहणार जैन गल्ली शेवगाव याच्यासह 159 कर्जदारांवर बँकेची आर्थिक फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील करीत आहेत.

हेही वाचा..

दरम्यान, या कारवाईमुळे सोनेतारण कर्जदारांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांनी आपली यात फसवणुक झाल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. या सोनेतारण व्यवहारात गोल्ड व्हँल्युअर, त्याचे मध्यस्थी व्यक्तीमार्फत संबंधित कर्जदारांना गाठून माझ्या नावे अगोदरच बँकेचे सोनेतारण कर्ज आहे. मला तातडीची आर्थिक गरज असून सोने मी देतो फक्त तुमच्या नावे बँकेत ठेवा असे सांगुन फसवणुक करत होते. मात्र हे सोने बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ज्यांच्या नावे सोनेतारण कर्ज घेतलेले आहे. ते अडचणीत आले असून गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचे धाबे दणाणले आहे. आता या फसवणूकीत गोल्ड व्हँल्युअर सोबत बँकेतील इतर कोण सहभागी होते का ?. त्यांचे मध्यस्थी करणारे दलाल कोण ? यांचा ही शोध घेण्याची गरज आहे.

तर आत्महत्या टळली असती

शेवगाव शाखेत बनावट सोने तारण ठेवून त्यावर मोठया प्रमाणात कर्ज उचलेले जात असल्याची तक्रार तत्कालीन व्यवस्थापक गोरक्षनाथ शिंदे यांनी सन 2018 मध्ये बँक प्रशासनाकडे केली होती. मात्र त्याची दखल घेतली नाही. उलट बँक प्रशासनाकडून त्यांच्यावरच दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याने त्यांनी मागील आठवडयात विषारी औषध घेवून आत्महत्या केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात दाखवलेली तत्परता बँक व्यवस्थापनाने अगोदरच दाखवली असती तर शिंदे यांच्यावर आत्महत्येची वेळ आली नसती, अशी खंत अनेकांनी व्यक्त केली.
 

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.