उजनीचा पाणीप्रश्न पेटला : इंदापूरच्या निषेध सभेत तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

त्याला वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला.
Ujani's water issue flares up : Attempt of self-immolation of a youth at a protest rally in Indapur
Ujani's water issue flares up : Attempt of self-immolation of a youth at a protest rally in Indapur

निमगाव केतकी (जि. पुणे)  ः उजनी धरणातून (Ujani dam) इंदापूरला (Indapur) पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांनी मंगळवारी (ता. १८ मे) रद्द करत असल्याची घोषणा केली. त्याचे तीव्र पडसाद इंदापूर तालुक्यात उमटले आहेत. उजनी पाणी प्रश्न चांगलाच पेटला असून जलसंपदा मंत्र्यांच्या घोषणेचा निषेध करण्यासाठी तालुक्यातील निमगाव केतकी येथे आज (ता. १९ मे) उजनी धरण पाणी संघर्ष समितीच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एका  तरुणाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या वेळी समितीच्या इतर कार्यकर्त्यांनी त्याला वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला.  (Ujani's water issue flares up : Attempt of self-immolation of a youth at a protest rally in Indapur)

पुणे शहरातून वाहून येणारे पाच टीएमसी पाणी उजनी धरणातून उचलून ते इंदापूर तालुक्यातील २२ गावांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्याला सोलापूर जिल्ह्यातून तीव्र विरोध झाला. सोलापूर जिल्ह्यातील वाढता विरोध पाहून जलसंपदा मंत्री पाटील यांनी या योजनेच्या सर्वेक्षणाचा निर्णय रद्द करत असल्याची घोषणा केली होती. तसेच, सोलापूर जिल्ह्याला धरणाच्या वाटपातील जे पाणी आले, त्यातील थेंबालाही धक्का लागणार नाही, अशी ग्वाही दिली होती. 

दरम्यान, जयंत पाटील यांच्या इंदापूरला पाणी देण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याच्या घोषणेचे तालुक्यात तीव्र पडसाद उमटले. त्या घोषणेच्या निषेधार्थ आज (ता. १९ मे) निमगाव केतकी येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त करत राज्य सरकारचा निषेध केला. सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात येत होत्या. त्यावेळी त्यातील एका युवक शेतकऱ्यांने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या वेळी समितीच्या इतर कार्यकर्त्यांनी त्याला वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in