आजचा वाढदिवस : डॅा भारती पवार, केंद्रीय राज्यमंत्री

डॅा भारती प्रवीण पवार या केंद्रीय महिला आरोग्य व कुटुंबकल्याण खात्याच्या राज्यमंत्री आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळविणाऱ्या त्या नाशिकच्या पहिल्या महिला आहेत. अतिशय आक्रमक राजकारणी अशी त्यांची प्रतिमा आहे.
आजचा वाढदिवस : डॅा भारती पवार, केंद्रीय राज्यमंत्री
Bharti pawar

डॅा भारती प्रवीण पवार (Dr. Bharti Pravin Pawar) या केंद्रीय महिला आरोग्य व कुटुंबकल्याण खात्याच्या राज्यमंत्री (Minister of state, womens and health) आहेत. दिंडोरी (Dindori constituency) लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. 

यापूर्वी त्या मानूर (कळवण) गटाच्या जिल्हा परिषद सदस्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आपली राजकीय कारकिर्द त्यांनी सुरु केली. त्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश पदाधिकारी होत्या. विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत त्यांनी बालमृत्यू तसेच शालेय पोषण आहार व आदिवासींच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवला. २०१४ मध्ये त्यांनी दिंडोरीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी केली. २०१९ मध्ये त्या याच मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या खासदार झाल्या. त्यानंतर नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात त्यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागील. त्यांनी उत्तर महाराष्ट्रात जनआर्शीवाद यात्रा काढली होती. टोमॅटोचे दर कोसळल्यावर त्यांनी त्यासाठी केंद्र शासनाकडून हमी खरेदी योजनेसाठी पाठपुरावा केला. 

नरूळ (ता. कळवण) हे त्यांचे जन्मगाव आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले. त्यांनी एम.बी.बी.एस. वैद्यकीय शाखेची पदवी प्राप्त केली आहे. त्यांचे पती प्रवीण हे अभियंता आहेत. तर कळवण मतदारसंघाचे सलग आठ वेळा विधीमंडळात प्रतिनीधीत्व केलेले, माजी राज्यमंत्री (कै) ए. टी. पवार हे त्यांचे श्वसुर होत. ही राजकीय पार्श्वभूमी लाभल्याने राजकीय, सामाजिक क्षेत्रात समरस होऊन काम केले. उमराणे (देवळा) या गटातून त्या पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्या झाल्या. मतदारसंघाचा कायापालट करण्याचा त्यांचा ध्यास आहे. 
...  

Related Stories

No stories found.