नारीशक्तीची कमाल..! जुन्नरमध्ये मायलेकींसह तिघींची कोरोनावर मात 
Three women from Junnar recovered from Corona

नारीशक्तीची कमाल..! जुन्नरमध्ये मायलेकींसह तिघींची कोरोनावर मात 

जुन्नर तालुक्‍यातील धोलवड येथील कोरोना पॉझिटिव्ह माय-लेकीने कोरोनावर मात केली आहे, त्यामुळे तालुक्‍यातील कोरोना संसर्गातून बरे होणाऱ्यांची संख्या तीन झाली आहे. विशेष म्हणजे या तीनही महिला आहेत.

जुन्नर : जुन्नर तालुक्‍यातील धोलवड येथील कोरोना पॉझिटिव्ह माय-लेकीने कोरोनावर मात केली आहे, त्यामुळे तालुक्‍यातील कोरोना संसर्गातून बरे होणाऱ्यांची संख्या तीन झाली आहे. विशेष म्हणजे या तीनही महिला आहेत. औरंगपूर येथील एका पुरुषाचा मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

"ग्रीन झोन'मध्ये असलेल्या जुन्नर तालुक्‍यात अखेर मुंबईहून धोलवडला आलेल्या पाहुण्यांच्या रुपाने कोरोनाचा शिरकाव झाला होता. येथील तिघे पॉझिटिव्ह निघाले होते. त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. यापैकी दोघींना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले असून तिसरे रुग्ण उपचार घेत आहेत. 

यापूर्वी डिंगोरे येथील पॉझिटिव्ह महिला उपचार घेऊन बरी झाल्याने 14 एप्रिल रोजी घरी परतली होती. त्यानंतर तालुक्‍यात एक महिन्यानंतर धोलवड येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. 

हवापालट करायला आला आणि क्वारंटाइन झाला 

मुंबईतील कोरोनाची वाढती भीती याबरोबरच वाढलेल्या उकाड्याने त्रस्त झाल्याने हवापालट करण्यासाठी गावाकडे येण्याचा निर्णय अंगलट आल्याची घटना जुन्नर तालुक्‍यातील एका गावात घडली आहे. 

गावाकडे फेरफटका मारण्यासाठी त्याने दुसऱ्या गावातील आपल्या पाहुण्याच्या गाडीचा आधार घेतला. भाजीपाला वाहतूक करणाऱ्या या गाडीतून लपत छपत आपल्या गावातील घरात प्रवेश केला आणि गावी घरात सुखरूप पोचल्याने समाधानाचा सुस्कारा सोडला. मात्र, त्याचे हे समाधान अल्पकाळच टिकले. 

...आणि बिंग फुटले 

कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या गावात होऊ नये म्हणून सध्या प्रत्येक गावात बाहेरगावाहून येणाऱ्यांवर गावकरी करडी नजर ठेऊन असतात. गावकऱ्यांच्या नजरेतून या महाशयांचे येणे सुटले नाही. सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक, आरोग्य सेवक यांना संदेश गेला. 

गावात नव्याने आलेल्या पाहुण्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. गावात कसे आला? अगोदर कळवले का नाही? याची विचारपूस झाली, तेव्हा सारं बिंग फुटले. आता आलात तर घराबाहेर पडायचे नाही. जेवण येथे पोच होईल. गावातील कोणाला घरी बोलवायचे नाही, अशी सक्त सूचना देण्यात येऊन आता तुम्हाला चौदा दिवस होम क्वारंटाइन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यामुळे गावातील फेरफटका, हवापाणी राहिले दूर आणि घरातच बसण्याची वेळ संबधितांवर आली. 

...तर गुन्हा दाखल होणार 

मुंबई-पुणेकरांनो सावधान जर गावी यायचे असेल, तर वैद्यकीय चाचणी व शासकीय परवानगी घेऊन योग्य वाहनाचा वापर करून या, अन्यथा आपल्याला गावातील कोरोना समितीच्या चौकशीस सामोरे जावे लागेल. दोषी आढळल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊन गुन्हा दाखल होऊ शकतो. 

Related Stories

No stories found.