सूर्य उगवायच्या आत तुला संपवतो 

जुनी भांडणे व सोशल मीडियातून एकमेकांना संपविण्याचे इशारे दिल्यामुळे ओंकार बाणखेले याची हत्या झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
सूर्य उगवायच्या आत तुला संपवतो 
Three arrested in Omkar Bankhele murder case

मंचर (जि. पुणे) : आंबेगाव तालुक्यातील मंचरजवळ एकलहरे–फकीरवाडी येथे सराईत गुन्हेगार ओंकार ऊर्फ राण्या बाणखेले (वय २६) याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मंचर पोलिस व गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने एकाला अटक केली असून १७ वर्षांच्या इतर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. जुनी भांडणे व सोशल मीडियातून एकमेकांना संपविण्याचे इशारे दिल्यामुळे ओंकार बाणखेले याची हत्या झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक विवेक पाटील यांनी दिली. (Three arrested in Omkar Bankhele murder case)

चैतन्य सत्यवान गायकवाड (वय १९, रा. काळुस माळवाडी, चाकण, ता. खेड) याच्यासह अल्पवयीन मुलांना सोमवारी (ता. २) नारायणगाव येथून ताब्यात घेण्यात आले. यातील चैतन्य गायकवाडला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अजूनही काही आरोपींना अटक होणार असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत. 


यासंदर्भात मंचरचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे म्हणाले की, शनिवारी (ता. ३१ जुलै) संतोष जाधव याने ‘सूर्य उगवायाच्या आत तुला संपवतो’ असे स्टेटसवर ठेवले होते. त्यास प्रत्युत्तर म्हणून ओंकार बाणखेले याने ‘संतोष जाधव भेटणार तिथे ठोकणार, कुठेपण असुदे’ असे स्टेटसवर ठेवले होते. त्यातूनच जाधव व बाणखेले यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. 

घटना स्थळापासून जवळच असलेल्या पोल्ट्री शेडच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता फकीरवाडीकडे जाताना स्कूटीवरुन प्रकाश पगारे मध्ये ओंकार बाणखेले व सतीश डोके बसले होते. स्कुटीच्या पाठीमागुन दुचाकी गाडीवर तिघे जण आले. त्यातील पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने स्कुटीवरील ओंकार बाणखेले याच्या डोक्यामध्ये दोन गोळ्या झाडल्या. पोलिसांना दोन पुंगळ्या मिळाल्या आहेत. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. गायकवाडची पार्श्र्वभूमी गुन्हेगारीची आहे. ओंकार बाणखेले यांचा भाऊ मयूर बाणखेले याने पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत संतोष जाधव याच्याविषयी संशय व्यक्त केला आहे. जाधव व अन्य साथीदारांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.