महसूलमंत्री थोरातांना एका महिला अधिकाऱ्याची व्यथा ऐकण्यास वेळ नाही - चित्रा वाघ

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून ऑडिओक्लीप द्वारे आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता.त्यामुळे राज्यभरात खळबळ माजली होती.
महसूलमंत्री थोरातांना एका महिला अधिकाऱ्याची व्यथा ऐकण्यास वेळ नाही - चित्रा वाघ
Sarkarnama (7).jpg

पारनेर : महसूल खात्याचे राज्याचे पालकत्व ज्या मंत्र्यांकडे आहे व जे याच जिल्ह्यातील आहेत अशा महसूल मंत्री  बाळासाहेब थोरात यांना एका महिला अधिकाऱ्याची व्यथा  ऐकण्यास व त्यावर बोलण्यास वेळ नाही. राज्यातील काही महिला सुसाईड नोट ड्रावर मध्ये ठेऊनच काम करत आहेत हे राज्याचे दुर्दैव आहे. राज्य सरकार शंभर  कोटी रूपये गोळा करण्यातच मग्न आहे. त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती गेली अनेक दिवसात करता आली नाही अशी टीका भारतीय जनता पक्षच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पारनेर येथे पत्रकारांशी बोलाताना केली.

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून ऑडिओक्लीप द्वारे आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता.त्यामुळे राज्यभरात खळबळ माजली होती. या प्रकरणात  वाघ  यांनी पहिल्याच दिवशी आपली प्रतिक्रीया व्यक्त करत नाराज व्यक्त केली होती. 

त्या आज (ता. 24 ) पारनेर येथे तहसीलदार देवरे यांच्या भेटीसाठी आल्या होत्या. त्यांनी तहसील कार्यालयात सुमारे एक तास  देवरे यांच्या सोबत बंद दाराआडून  चर्चा केली. त्या नंतर त्या  पत्रकारांशी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, राज्यात असलेले महाविकास आघाडीचे सरकार महिलांना न्याय देईल की नाही याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली.  माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण झाल्या नंतर पहिल्याच दिवशी या प्रकरणात  मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे यासाठी त्यांना पत्र दिले होते. मात्र अघाडी सरकारमधील एकाही पक्षाने एका महीला अधिकाऱ्याची दखल घेतली नाही. 

राज्यामध्ये तीन पक्षाचे सरकार असूनही महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने आठ वेळा महिला अध्यक्षपदाचा प्रस्ताव पाठवूनही महिला आयोगाच्या अध्यक्षपाची अद्यापही कोणाचीही निवड निवड झाली नाही.  तर राज्यासह इतर जिल्ह्यांमध्ये  महिलांवर अत्याचाराचे प्रमाण मोठे वाढले आहे.  बीडसारख्या जिल्ह्यात पाच मुलींवर बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. यावर सरकारचे प्रतिनिधी काही बोलत नाहीत. 

 तहसीलदार देवरे यांच्या पाठीशी आम्ही शेवटपर्यंत राहणार असल्याचे आश्वासन  वाघ यांनी या वेळी  दिले. त्यामुळे आम्ही महिला आयोगाच्या सदस्य सचिव अनिता पाटील यांनी देवरे यांच्या संपर्कात राहून त्यांचे मनपरिवर्तन केले आहे त्यामुळे मी पक्षाच्या वतीने  त्यांचे विशेष आभार मानत आहे. 

तहसीलदार देवरे यांची ऑडिओ क्लिपद्वारे मांडलेली व्यथा मी   ५० वेळा ऐकली. काम करताना आत्महत्याची सुसाईड नोट  ठेवून काम करावे लागत आहे हे दुर्दैव आहे. वनविभागाच्या दिपाली चव्हाण सारख्या अनेक महिलांचा बळी या व्यवस्थेत गेला आहे. या महिलेच्या व्यथा ऐकुन किमान या गंभीर विषयावर महसुल मंत्री थोरात बोलतील व काही तरी कारवाई करतील अशी अपेक्षा होती मात्र त्यांनी व सरकारने हा विषय गांभीर्याने  घेतला नाही.

देवरे जीव दिला नाही त्यामुळे सरकार कारवाई करत नाही. तहसीलदार देवरे यांनी आत्महत्या केली नसल्याने सरकारला त्याचे गांभीर्य नाही. त्यामुळे या प्रकरणाबद्दल मी जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना भेटून चर्चा करणार असल्याचे  वाघ यांनी सांगितले.

एखादा बाईला बदनाम करणे सोपी बाब आहे त्यामुळे महिलेला घरी पाठविण्यासाठी सर्व पुरुष मंडळी एकत्र येत असल्याचा आरोप सुद्धा या वेळी वाघ यांनी केला. महाआघाडी चे सरकार महिला सक्षमीकरणाच्या फक्त  बाता मारतात. मात्र बेलगाम सत्तेच्या घोड्यांना लगाम कधी घालणार असा सवालही त्यांनी केला. 

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, विवेक नाईक ,शहराध्यक्ष भैय्या गंधे, तालुकाध्यक्ष वसंतराव चेडे, सुजित झावरे पाटील, राहुल शिंदे, सुनील थोरात ,सुभाष दुधाडे‌, उपसरपंच सागर मैंड ,तुषार पवार, जिल्हा महिला अध्यक्षा अश्विनी  थोरात,  महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष उषा जाधव ,सचिन ठुबे‌,  मनोहर पारखे , सतीश पिंपरकर, विश्वास रोहकले यांच्या सह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.