पुणे-नाशिक रेल्वे मार्गावर असणार ही 8 स्थानके 
These 8 stations will be on Pune-Nashik railway line

पुणे-नाशिक रेल्वे मार्गावर असणार ही 8 स्थानके 

नियोजीत पुणे-नाशिक रेल्वे मार्गाला राज्य सरकार कधी मंजुरी देणार, याकडे आता 'महारेल'चे लक्ष लागले आहे. या मार्गावर 8 प्रमुख स्थानकांसाठी शिफारस करण्यात आली आहे. त्याला राज्य सरकारची मंजुरी अपेक्षित आहे. ही प्रक्रिया झाल्यावर 1200 दिवसांत प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे.

पुणे : नियोजीत पुणे-नाशिक रेल्वे मार्गाला राज्य सरकार कधी मंजुरी देणार, याकडे आता "महारेल'चे लक्ष लागले आहे. या मार्गावर 8 प्रमुख स्थानकांसाठी शिफारस करण्यात आली आहे. त्याला राज्य सरकारची मंजुरी अपेक्षित आहे. ही प्रक्रिया झाल्यावर 1200 दिवसांत प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे. 

पुणे-नाशिक रेल्वे मार्गाला मध्य रेल्वे आणि रेल्वे खात्याने परवानगी दिली आहे. आता राज्य सरकारच्या परवानगीकडे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमआरआयडीसी) या बाबतचा प्रकल्प अहवाल राज्य सरकारकडे सुमारे सहा महिन्यांपूर्वी सादर केला आहे, अशी माहिती महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल यांनी दिली. 

या रेल्वे मार्गावर पिंपरी-चिंचवड, चाकण, खेड, रांजणगाव, सिन्नर, नाशिक येथे औद्योगिक वसाहती आहेत. त्यांनाही या मार्गाला जोडण्यात येणार आहे. त्यांच्यासाठीही स्वतंत्र रेल्वे लाईन टाकण्यात येईल. तसेच, रेल्वे मार्गावर स्थानकांसाठी 24 जागा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. त्यातून किमान 8 प्रमुख स्थानके असतील. राज्य सरकारने ही स्थानके निश्‍चित करायची आहेत. त्यानुसार त्यांची रचना करण्यात येणार आहे. तसेच, लहान स्थानकांसाठी स्वतंत्र लोहमार्ग असेल. त्यावर लोकलसारखी वाहतूक व्यवस्था उभारण्याचेही महारेलचे नियोजन आहे. 

चाकण, राजगुरुनगर, संगमनेर आणि नाशिक येथे प्रवाशांसाठी मल्टिमोड्यूल हब उभारण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना उपयुक्त सुविधा देता येतील तसेच त्या स्थानकाचा व्यावसायिक वापरही शक्‍य होणार आहे. 

►पुणे- नाशिक मार्गावर यातून होणार 8 स्थानके 
►पुणे, हडपसर, मांजरी, कोलवडी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, भोरवाडी, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, जांबूट, साकूर, आंभोरे, संगमनेर, देवथान, चास, दोडली, सिन्नर, मुढारी, शिंदे, नाशिक 
►पुणे, हडपसर, खेड, मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर, नाशिक या परिसरात स्थानके होऊ शकतात. परंतु, राज्य सरकारने त्याला मंजुरी दिल्यावर या बाबतचा निर्णय जाहीर होईल, असे "महारेल'कडून सांगण्यात आले. 
►रेल्वे मार्गाचे अंतर 235 किलोमीटर आहे.
►पुणे स्थानकावर मालधक्‍क्‍याच्या जागेवर नवे स्थानक उभारून तेथून रेल्वे सुटणार 
►पाच किंवा सहा स्थानके असल्यास सुमारे दोन तासांत रेल्वे प्रवास शक्‍य 
►प्रकल्पासाठी सुमारे 16 हजार कोटी रुपये खर्च येणार 
►महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालय त्यासाठी प्रत्येकी 3 हजार     208 कोटी रुपये खर्च करणार 
►उर्वरित 9 हजार 624 कोटी रुपये वित्तिय संस्थांकडून कर्जाच्या माध्यमातून उभाणार 

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी राज्य सरकारला 3 हजार 208 कोटी पाच वर्षांत द्यायचे आहेत. त्यामुळे पहिल्या वर्षांत थोडीफार रक्कम मिळाली तरी, प्रकल्पाचे काम सुरू होईल. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे. 
-शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार 

Related Stories

No stories found.