बलात्काराच्या घटना थोपविण्यासाठी सुप्रिया सुळेंनी दिला मोलाचा सल्ला
supriya tai sule.jpg

बलात्काराच्या घटना थोपविण्यासाठी सुप्रिया सुळेंनी दिला मोलाचा सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून आपले मत व्यक्त केले.

मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरातील साकीनाका येथे निर्भयेवर बलात्कार झाला होता. त्या पीडित महिलेची मृत्यूची झुंज अपयशी ठरली. उपचारा दरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. राज्या बलात्काराच्या घटना वाढत आहे. यावर राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून आपले मत व्यक्त केले.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मुंबईतील साकीनाका येथे घडलेली महिला अत्याचाराची घटना संतापजनक आणि दुःखद आहे. अशा घटनांनंतर चर्चासत्रे होतात, राजकीय आरोप प्रत्यारोप होतात. पण आता यापुढे अशा घटना होणारच नाही यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे.

हेही वाचा...

शासन-प्रशासन, पोलिस यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, माध्यमे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जनता या सर्व घटकांनी एकजुटीने अशा घटना रोखण्यासाठी खंबीर आणि निर्णायक पावले उचलण्याची हीच वेळ आहे.

नाशिकमध्ये हैद्राबादच्या ‘SHE टिम’च्या धर्तीवर ‘निर्भया’ पथके गठीत करण्यात आल्या होत्या. त्यांच्याकडे छुपे कॅमेरे देऊन नराधमांच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. हा प्रयोग महाराष्ट्रभर राबविता येणे शक्य असून पोलिसांना यासाठी विशेष प्रशिक्षण देऊन त्यांची वज्रमुठ केल्यास अशा अपराधांना कायमचा आळा घालणे शक्य होईल. 

हेही वाचा...

याशिवाय अशाप्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा डेटाबेस तयार करुन त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. रस्त्यावरील महिला आणि मुलांसाठी योग्य निवारा आणि पुनर्वसन यालाही प्राधान्य देणे आवश्यक आहे.  
महिला आणि मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना कायमचा आळा घालण्यासाठी एकीची वज्रमुठ करू, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.