दिग्विजय बागल हे बालिश असून विश्वासघात हा त्यांच्या रक्तातच आहे

कर्ज प्रकरणावरून जयवंतराव जगताप यांनी आमदार शिंदे यांची पाठराखण केली आहे.
supporting to MLA Sanjay Shinde, Jayawantrao Jagtap criticizes Narayan Patil and Digvijay Bagal
supporting to MLA Sanjay Shinde, Jayawantrao Jagtap criticizes Narayan Patil and Digvijay Bagal

करमाळा (जि. सोलापूर) : आमदार संजय शिंदे हे त्यांचे साखर कारखाने व सभासदांचे प्रश्न सोडवायला सक्षम आहेत. त्यामुळे कुवत नसणारांनी उगाच लुडबूड करू नये, असा टोला लगावत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी कर्ज प्रकरणावरून माजी आमदार नारायण पाटील व मकाई कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यावर निशाणा साधला. (supporting to MLA Sanjay Shinde, Jayawantrao Jagtap criticizes Narayan Patil and Digvijay Bagal)

आमदार संजय शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर काढलेल्या कर्जाचा विषय गाजत आहे. यावर नारायण पाटील व दिग्विजय बागल यांनी संजय शिंदे यांच्यावर केलेल्या टिकेवरून जयवंतराव जगताप यांनी आमदार शिंदे यांची पाठराखण करत चोख प्रतिउत्तर दिले आहे. 

माजी आमदार जगताप म्हणाले की, आमदार संजय शिंदे हे त्यांचे कारखाने चालवायला सक्षम आहेत. आपण आपल्या ताब्यातील कारखान्यांची काय दुरवस्था केली, हे अगोदर बागल व पाटील या तालुक्‍यातील जनतेने नाकारलेल्या नेत्यांनी पहावे. त्यानंतरच माढा तालुक्‍यातील प्रश्नांकडे पाहावे. सध्या करमाळा तालुक्‍यामध्ये आमदार शिंदे यांनी बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर व विकास कामांवर भर देवून तालुक्‍यातील रस्ते, वीज, पाणी व आरोग्याची कामे मार्गी लावत असल्यामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. परंतु विरोधकांना मात्र आपल्या राजकीय भवितव्याची चिंता लागून त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे ते आमदार शिंदे यांच्या कारखान्यांच्या कर्जाबाबत बेछूट आरोप करीत आहेत. 

आमदार शिंदे यांनी आरोग्य विभागासाठी कोट्यवधींचा निधी आणून कोविड काळात सर्वोतपरी मदत केली आहे. रस्ता व विजेची प्रश्ने मार्गी लावले आहेत. आठवड्यातून दोन ते तीन दिवस मंत्रालयात हजर राहून सरकार दरबारी तालुक्‍यातील विविध विकास कामांचा पाठपुरावा करत आहेत. त्यांचे सरकार दरबारी वजन असल्यामुळेच इंदापूर तालुक्‍याला पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द झाला. आमदार शिंदे बंधूंनी माढा तालुक्‍यात विधायक काम केल्यामुळेच साखर कारखाने, सूतगिरणी, बॅंका, दूध डेअरी काढून अनेक जनतेचे प्रपंच उभे केले आहेत, असेही ते म्हणाले.

...तर तालुक्‍याची राजकीय परिस्थिती आज वेगळी असती

माजी आमदार नारायण पाटील हे आत्ता करमाळा बाजार समितीचे शिवाजी बंडगर आमचे नसल्याचे जाहीर करत आहेत. परंतु, बिनशर्त पाठिंबा जाहीर करताना ऐनवेळी बंडगर यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला नसता व बंडगर यांनी आमच्या गटातून निवडून येवून बंडखोरी केली नसती, तर कदाचित आज करमाळा तालुक्‍याची राजकीय परिस्थिती वेगळी दिसली असती. दिग्विजय बागल हे संजय शिंदे यांच्या ताकदीचे व फार मोठे नेते नाहीत. कारण दिग्विजय बागल हे बालिश असून विश्वासघात हा त्यांच्या रक्तातच असल्याची कडवट टीका जयवंतराव जगताप यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in