व्यावसायिकाची पत्नी व मुलीसह आत्महत्या

केडगाव येथील एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृतावस्थेत आढळून आले आहेत.
व्यावसायिकाची पत्नी व मुलीसह आत्महत्या
kedgaon.jpg

नगर : कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करण्याचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही. राज्य सरकारकडून शेतकरी कर्ज माफी जाहीर होऊनही त्यांच्यापर्यंत कर्ज माफीचा लाभ होत नसल्याच्या तक्रारीही आहेत. यातच आता व्यावसायिकही कर्ज बाजारीपणाला कंटाळले आहेत. नोटाबंदी, जीएसटी व लॉकडाउनमुळे व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट आले आहे.

केडगाव येथील एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृतावस्थेत आढळून आले आहेत. आई-वडिलांनी दहा वर्षांच्या मुलीला गळफास देवून नंतर स्वत:ही गळफास घेतल्याची माहिती समोर येत आहे. 

हेही वाचा...

सोमवारी (ता. 6) सकाळी ही घटना उघडकीस आली. यात आई-वडिलांसह चार वर्षीय लहान मुलीचा समावेश आहे. केडगाव देवी रस्त्यावरील ठुबे मळा येथील अथर्व नगर येथील फाटक कुटुंबात हा प्रकार घडला. 

संदीप दिनकर फाटक (वय 40), किरण संदीप फाटक (वय 32), मैथिली संदिप फाटक (वय 10 ) अशी मयतांची नावे आहेत. फाटक हे औषध व्यावसायिक होते. परंतु, व्यवसायात अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने कर्ज वाढल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर येत आहे. सकाळी तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. पोलिसांना आत्महत्येची चिठ्ठीही मतदेहांजवळ सापडली आहे. केडगावमध्ये या आत्महत्येमुळे शोककळा पसरली आहे. केडगाव हे अहमदनगर शहराचे एक उपनगर आहे. घटनास्थळी कोतवाली पोलिस ठाण्याचे पथक तैनात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Related Stories

No stories found.