पोलिस दलातील संघर्षयोध्याची कोरोनाशी झुंज अपयशी  

राहूल बोराडे यांच्या निधनाने सोलापूर पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
 Vaijnath Borade .jpg
Vaijnath Borade .jpg

सोलापूर :  सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत असलेल्या जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक राहूल वैजिनाथ बोराडे (Sub-Inspector  Vaijnath Borade) यांचे निधन झाले. कोरोना (Covid-19) नंतर फुफ्फुसातील संसर्ग वाढल्याने त्यांचे निधन झाले. त्यांना कोरोना झाल्यानंतर तातडीने उपचारासाठी रुग्णाल्यात दाखल करण्यात आले होते. परंतु,कोरोना नंतर फुफ्फुसातील संसर्ग वाढल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.  (Sub-Inspector of Police Rahul Vaijnath Borade dies in Corona)

राहूल यांनी 2017 मध्ये एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. फौजदार ते काही महिन्यापुर्वीच सोलापूर पोलीस आयुक्तालयात रुजू झाले होते. अवघ्या 36 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. राहूल बोराडे यांच्या निधनाने सोलापूर पोलीस दलात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, वहिनी असा मोठा परिवार आहे.  

बोराडे यांना 3 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. तत्पूर्वी, त्यांचे आई-वडील, मुलगीही कोरोना पॉझिटिव्ह होती. उपचारातून ते सर्वजण बरे झाले, बोराडे हे ही उपचार घेऊन काही दिवस घरी परतले होते. त्यानंतर त्रास वाढल्याने पुन्हा सोलापुरातील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना पुण्यातील रुग्णाल्यात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी (ता. 8) मृत्यू झाला.  

दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांची तब्बेत सुधारली होती आणि लवकरच त्यांना घरी सोडले जाईल, असे डॉक्‍टरांनीही सांगितले होते. मात्र, पुन्हा त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले. राहूल यांच्या निधनानंतर शहर पोलिस दलातील बहुतेक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमधील व्हॉट्‌सअप स्टेटसवर त्यांचा फोटो पहायला मिळाला. 

राज्यात मंगळवारी (ता. ८ जून) दिवसभरात १६ हजार ५७७ रूग्णांनी कोणावर मात केली. तर, १० हजार ८९१ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर राज्यात २९५ कोरोनाबाधितांच्या मृ्त्यूची नोंद झाली. राज्यात आजपर्यंत एकूण ५५ लाख ८० हजार ९२५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५. ३५ टक्के झाला आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.७३ टक्के आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in