नागवडे कारखान्याची बदनामी थांबवा : संचालक मंडळाचे आवाहन 

आरोपांना उत्तर देण्यासाठी राजेंद्र नागवडे यांची पाठराखन करत विद्यमान संचालक मंडळाने आज पत्रकार परिषद घेतली.
nagawade karkhana.jpg
nagawade karkhana.jpg

श्रीगोंदे : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक केशवराव मगर व अण्णासाहेब शेलार यांनी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या विरुद्ध बंड करून त्यांचा कारभार भ्रष्टाचाराने माखलेला असल्याचे आरोप केले होते. संचालक मंडळाला विश्वासात न घेता ते कारभार करतात असाही आरोप केला होता. या आरोपांना उत्तर देण्यासाठी राजेंद्र नागवडे यांची पाठराखन करत विद्यमान संचालक मंडळाने आज पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेला अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्यासह उपाध्यक्ष युवराज चितळकर, सुभाष शिंदे, अॅड. सुनील भोस, श्रीनिवास घाडगे, अरुण पाचपुते, राकेश पाचपुते, अशोक रोडे, विजय कापसे, शरद खोमणे, सुनील माने, हेमंत नलगे, राकेश पाचपुते, बंडोपंत रायकर, शिवाजी जगताप, विश्वनाथ गिरमकर, सचिन कदम, विलास काकडे उपस्थित होते.

हेही वाचा...

कारखान्याच्या कारभारात संचालक म्हणून अधिकार असतानाही, कधीही चांगल्या बाबतीत सहकार्य न करता कारखान्याच्या बदनामीची मोहीम काही लोकांनी हाती घेतली आहे. कारखान्यावर आरोप करणे म्हणजे बापूंवर टीका करण्यासारखे असल्याचेही भान या लोकांना राहिले नाही. चुकीचे आरोप करण्यापेक्षा निवडणूक रिंगणात येऊन लढा, असे आवाहन कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांनी दिले.  

शिंदे म्हणाले, की कारभारावर जे आरोप करतात, ते याच कारभारात सहभागी असल्याचे विसरतात. सहवीजनिर्मिती प्रकल्पाबाबत होणाऱ्या आरोपांत तथ्य नाही. आरोप करणाऱ्यांना वास्तव माहिती असले, तरी त्यांना निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्याचा आभास होत आहे. खोटे बोल पण रेटून बोल, अशी त्यांची गत झाली आहे. नलगे यांनीही विरोधकांना लक्ष्य करीत, आम्ही सगळे संचालक राजेंद्र नागवडे यांच्या कारभारावर समाधानी असून, तेच पुढचे अध्यक्ष आहेत, असे सांगितले. 

हेही वाचा...

काकडे म्हणाले, की विरोधकांनी पोकळ दमबाजी करण्यापेक्षा निवडणूक रिंगणात येऊन लढावे. राजेंद्र नागवडे म्हणाले, की नागवडे कारखान्याचे राज्यात आगळेवेगळे नाव आहे. बापूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेत आहोत. केशव मगर, अण्णासाहेब शेलार यांच्यात व आमच्यात संचालक मंडळ बैठकीत कुठलाही वाद झालेला नाही. मगर यांनी बारकाईने कारखान्यात लक्ष दिले नाही. मात्र, ते आता बदनामी करीत आहेत. त्यांनी बदनामी थांबवावी. 

तर राजीनामा देईन 
बापूंच्या पुतळ्याबाबत आपणावर आरोप होतात. अण्णासाहेब शेलार हे स्मारकात गैरव्यवहार झाल्याचे बिनबुडाचे आरोप करतात. त्यांनी हे आरोप सिद्ध केले तर आपण कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ, असे खुले आव्हान राजेंद्र नागवडे यांनी विरोधकांना दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in