विधिमंडळाच्या आवारात गणपतराव देशमुखांचे स्मारक उभारावे : फडणवीस 

आबासाहेबांची उंची व कर्तृत्व एवढे मोठे आहे की त्यांनी विधानमंडळाच्या संस्थेची उंची वाढवली आहे.
विधिमंडळाच्या आवारात गणपतराव देशमुखांचे स्मारक उभारावे : फडणवीस 
Statue of Ganapatrao Deshmukh should be erected in the premises of the Legislature

सांगोला (जि. सोलापूर) :  ज्येष्ठ नेते गणपराव देशमुख ऊर्फ आबासाहेबांसारखी माणसे ही पक्षविरहीत आहेत. आबासाहेबांची विधानमंडळातील भाषणे ऐकून आमच्यासारख्या अनेकांना महाराष्ट्राचे प्रश्न समजले आहेत. आबासाहेबांची उंची व कर्तृत्व एवढे मोठे आहे की त्यांनी विधानमंडळाच्या संस्थेची उंची वाढवली आहे. अशा महान, तत्वनिष्ठ व्यक्तीचा विधिमंडळाच्या आवारात स्मारकरूपी पुतळा उभा करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. (Statue of Ganapatrao Deshmukh should be erected in the premises of the Legislature: Fadnavis)
   
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आज मंगळवारी (ता. 17) रोजी देवेंद्र फडणवीस यांनी सांगोल्यात येऊन भेट घेतली. 

या भेटीवेळी (कै.) गणपतराव देशमुख यांचे चिरंजीव पोपटराव देशमुख, चंद्रकांत देशमुख, आबासाहेबांचे नातू बाबासाहेब देशमुख यांच्यासह खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत परिचारक, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते, धैर्यशील मोहिते-पाटील, तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, शशिकांत चव्हाण, माजी आमदार लक्ष्मण ढोबळे, आमदार राहुल कुल, आमदार जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्ल्याणशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, नानासाहेब लिगाडे, अभिजीत नलवडे, दत्ता टापरे आदी मान्यवर उपस्थित होते.

पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दुष्काळी भागातील लोकांचे दुःख जाणारा नेता, सामान्यासाठी सतत लढत असलेले व प्रश्न सोडविणारे नेते म्हणून गणपतराव देशमुख यांची ओळख होती. त्यांनी सर्वसामान्यांसाठी केलेले कार्य महान आहे. गणपतरावांच्या कार्याची खूप मोठी परंपरा आहे. त्यांच्या कार्यात त्यांच्या कुटुंबीयांनीही साथ दिली आहे. अशा तत्वनिष्ठ व्यक्तीच्या विधानभवनाच्या आवारात स्मारकरुपी पुतळा उभा केला पाहिजे. याचा अधिकार जरी विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांना असला तरी त्यांना भेटून स्मारक उभारणीची विनंती मी करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

आबांना मतदान करण्यास मला आनंद झाला असता

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीसंदर्भात पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, त्यांनी या वेळी मी राजकारणावर बोलणार नसल्याचे सांगितले. पण, आबासाहेबांसारख्या पक्षविरहीत नेत्याला मतदान करताना मला आनंद झाला असता, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in