आमदार बबनदादा शिंदेंनी आरोग्य मंत्री टोपेंकडे केली ही मागणी 

सोलापूर जिल्ह्याला लस कमी प्रमाणात मिळालेली आहे.
Solapur district should get corona vaccine in proportion to its population
Solapur district should get corona vaccine in proportion to its population

टेंभुर्णी (जि. सोलापूर) : सध्या राज्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विचारात घेऊन सोलापूर जिल्ह्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस लोकसंख्येच्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे, अशी माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. (Solapur district should get corona vaccine in proportion to its population : MLA Babandada Shinde)

सध्या सोलापूर जिल्हा ‘रेड झोन’मध्ये आहे. मागील काही दिवसांत लसीचा तुटवडा असल्यामुळे सोलापूर जिल्ह्याला लस कमी प्रमाणात मिळालेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण करणे, हा पर्याय समोर येत आहे. लसीकरण झालेल्या रुग्णांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. लोकसंख्येच्या आणि रुग्णांच्या प्रमाणात लशीची मात्रा कमी पडत असल्याने सोलापूर जिल्ह्यात लसीकरण तुलनेने कमी प्रमाणात झाले आहे. 

पुणे महसुली विभागात लोकसंख्येनुसार दुसऱ्या क्रमांकावर (43 लाख) असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यास पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांच्या तुलनेत लशींचा पुरवठा कमी झाल्याची वस्तुस्थिती आमदार बबनराव शिंदे व आमदार संजयमामा शिंदे यांनी मागील आठवड्यात राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

याबाबत आमदार बबनराव शिंदे म्हणाले की, पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी पुणे विभागाच्या आरोग्य उपसंचालक अर्चना पाटील यांना सूचना दिलेल्या आहेत, त्यामुळे आगामी काळात कोरोना प्रतिबंधक लशींचा पुरवठा सुरळीत होण्यास काही प्रमाणात मदत होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in