नीलेश लंके म्हणाले, समाजकारणासाठी राजकारण प्रभावी माध्यम

राजकारण म्‍हणजे एक प्रकारचे समाजकार्यच आहे. सत्तेचा उपयोग गरजू, गरीब जनतेसाठी व्हायला हवा. समाजकारण करू इच्‍छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजकारण हे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन पारनेरचे (जि. नगर) आमदार नीलेश लंके यांनी केले.
नीलेश लंके म्हणाले, समाजकारणासाठी राजकारण प्रभावी माध्यम
Nilesh Lanke

नाशिक : राजकारण म्‍हणजे एक प्रकारचे समाजकार्यच आहे. (Politics is a kind of social work) सत्तेचा उपयोग गरजू, गरीब जनतेसाठी व्हायला हवा. (Powers shall be utilise for poor & needy) समाजकारण करू इच्‍छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजकारण हे प्रभावी माध्यम आहे, (politics is a powerfull medium for Social worker) असे प्रतिपादन पारनेरचे (जि. नगर) आमदार नीलेश लंके यांनी येथे केले.

‘यिन’ अधिवेशनात उपस्‍थित तरुणाईसोबत संवाद साधताना श्री. लंके यांनी राजकारणात यशस्‍वी होण्यासाठीच्‍या टिप्‍स दिल्या. ते म्‍हणाले, की राजकारणात काम करताना समाजकारण उच्च शिखरावर नेले पाहिजे. त्यामुळे तुम्हाला कुणीही मागे खेचू शकत नाही. तसेच राजकारणात वेळेनुसार निर्णय घेण्याची क्षमता हवी. चतुराई असण्यासोबत चेहरा वाचता आला पाहिजे. अपयश आले तरी खचून न जाता इच्‍छाशक्‍ती व सकारात्‍मक दृष्टिकोन ठेवत वाटचाल करायला हवी. सत्तेचा वापर अश्रू पुसण्यासाठी करावा. शिवाय तरुणाईने व्‍यसनापासून दूर राहावे. स्‍वतःसोबत सामाजिक आरोग्‍याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे.

आरोग्‍य मंदिराने दिला आधार
कोरोनाकाळात इतर ठिकाणी कोरोना केअर सेंटर कार्यरत असताना श्री. लंके यांनी आपल्या मतदारसंघात शरद पवार यांच्‍या नावाने सुरू केलेल्‍या आरोग्‍य मंदिराविषयीची माहिती दिली. कोरोना महामारीत बहुतांश मृत्‍यू भीतीमुळे झाल्‍याचे सांगताना हीच गोष्ट लक्षात घेत आरोग्‍य मंदिरात उपचार करण्यासह भीती घालविण्याचा प्रयत्‍न यशस्‍वी ठरल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

एक दिवस राज्याच्या मंत्रिमंडळात येवो!
‘यिन’ अधिवेशनातील सहभागींना राज्याचे सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी पत्र पाठवून शुभेच्‍छा दिल्‍या. श्री. मुंडे म्हणाले, की ‘सकाळ’ माध्यम समूहाच्‍या ‘यंग इन्‍स्‍पिरेटर्स नेटवर्क’च्या अधिवेशनात सहभागी शॅडो कॅबिनेटचे मी अभिनंदन करतो. काही अपरिहार्य कारणामुळे अधिवेशनास उपस्‍थित राहता आले नाही. आपल्‍यातील नेतृत्वगुण अधिक विकसित होऊन एक दिवस राज्याच्या मंत्रिमंडळात येऊन आपल्‍या हातून महाराष्ट्राची सेवा घडो, ही सदिच्‍छा. राजकारणात नाव, वारसा, पैसे नाही, तर जनतेच्‍या प्रश्‍नांची जाण व त्‍याची उकल करण्याची क्षमता आणि ती उकल जनतेपर्यंत पोचवून लाभ मिळवून देणे हे कौशल्‍य अवगत असले पाहिजे. मंत्रिमंडळातच नाही, तर आपण ज्‍या क्षेत्रात जाल, त्‍या ठिकाणी आपल्‍याला यश मिळो, अशा मनःपूर्वक शुभेच्‍छा देतो.

अधिवेशनासाठीचे परिश्रम
‘यिन’चे प्रमुख व संपादक संदीप काळे, ‘यिन’चे राज्‍य व्‍यवस्‍थापक श्‍यामसुंदर माडेवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली ‘यिन’चे विभागीय अधिकारी नितीन धांडे, गणेश जगदाळे (नाशिक), अवधूत गायकवाड (कोल्‍हापूर), ‘यिन’चे जिल्‍हाधिकारी अभिजित शिंदे (सोलापूर), हरीश शर्मा (औरंगाबाद), अभिजित बर्गे (सातारा), कृष्णा शर्मा (नागपूर), आकाश गायकवाड (जालना), गणेश घोलप (मुंबई), अनिकेत मोरे, अनुजा पाटील, आकाश पांढरे (पुणे) यांनी अधिवेशन यशस्वितेसाठी सहकार्य केले.
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.