अजित पवार व शिवेंद्रराजे भोसले यांच्यात बारामतीत बंद खोलीत चर्चा

साता-याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मात्र ही भेट मतदारसंघातील कामासंदर्भात होती, असे सांगून या बाबत अधिक भाष्य करण्यास शिवेंद्राराजे यांनी नकार दिला.
अजित पवार व शिवेंद्रराजे भोसले यांच्यात बारामतीत बंद खोलीत चर्चा
Ajit Pawar-Shivendraraje

बारामती : साता-याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मात्र ही भेट मतदारसंघातील कामासंदर्भात होती, असे सांगून या बाबत अधिक भाष्य करण्यास शिवेंद्राराजे यांनी नकार दिला.

आज सकाळी अजित पवार यांच्या भेटीसाठी शिवेंद्रराजे बारामतीतील विद्या प्रतिष्ठान संकुलातील व्हीआयआयटीमध्ये हजर झाले. बंद खोलीमध्ये अजित पवार यांच्याशी त्यांनी पंधरा मिनिटे चर्चा केली. त्या नंतर माध्यमांनी त्यांना गाठले असता त्यांनी फक्त मतदारसंघातील कामासाठी आलो होतो, त्यात वेगळे नव्हते असे सांगून ते तेथून निघून गेले. 

अजित पवार यांच्याशी या पूर्वीही शिवेंद्रराजे यांनी मतदारसंघातील कामासंदर्भात चर्चा केलेली होती, त्या मुळे आज त्यांच्या भेटीने पुन्हा काही नवीन राजकीय समीकरणे उदयाला येणार की फक्त मतदारसंघातील कामाबाबतच ही भेट होती या बाबत कार्यकर्त्यांतही चर्चा सुरु झाली आहे. 

Edited By- Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in