शिवद्रोही श्रीपाद छिंदम आणि त्याच्या भावाला पोलिसांनी केली अटक

ही घटना 9 जुलै 2021 दिवशी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली होती.
Shripad Chndam.jpg
Shripad Chndam.jpg

अहमदनगर : महापालिकेतील कर्मचाऱ्याला दुरध्वनी वरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणारा भाजपचा माजी उपमहापौर शिवद्रोही श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद महापालिकेने अपात्र ठरविले आहे. श्रीपाद छिंदम विरोधात महाराष्ट्रभर संतापाची लाट होती. मात्र तरीही श्रीपाद छिंदम याच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. 

आता श्रीपाद छिंदम व त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यांचे आणखी एक गुन्ह्यात नाव पुढे आले आहे. या गुन्ह्यात तोफखाना पोलिसांकडून या दोन्ही भावांना आज अटक केली आहे. दिल्लीगेट येथील ज्यूस सेंटर चालकास जातीवाचक शिविगाळ प्रकरणी दाखल गुन्ह्यात ही अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दिली. या दोघांचे जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळले होते. ही घटना 9 जुलै 2021 दिवशी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली होती.

हेही वाचा...

गुन्ह्यातील इतर दोन आरोपींना मात्र, न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. एका टपरी चालकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दमदाटी करत तसंच जातीवाचक शिव्या दिल्याप्रकरणी छिंदमसह 4 जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अहमदनगरच्या तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये अॅट्रॉसिटीसह विविध कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात, छिंदमसह त्याच्या भावाला अटक करण्यात आली. याप्रकरणी आरोपी श्रीकांत शंकर छिंदम, श्रीपाद शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे आणि राजेंद्र म्याना यांच्याविरोधात नगरच्या तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in