'राष्ट्रवादीला पायाखाली घेऊ' म्हणणाऱ्या खासदारांनी व्यक्त केली दिलगिरी 

खासदार संजय जाधव यांनी भूजबळ यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
'राष्ट्रवादीला पायाखाली घेऊ' म्हणणाऱ्या खासदारांनी व्यक्त केली दिलगिरी 
3Sarkarnama_20Banner_20_202021_08_09T164107.639.jpg

मुंबई : ''वेळ आल्यावर माकडीणही आपल्या पिल्लाला पायाखाली घालते. आम्हीही राष्ट्रवादीला पायाखाली घालू", असा इशारा शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव (Shiv Sena MP Sanjay Jadhav) यांनी नुकताच दिला होता.  खासदार संजय जाधव हे जालन्यात शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. त्यांच्या या विधानानंतर त्यांनी राष्ट्रवादी नेते छगन भूजबळ यांच्यावरीही टीका केली आहे. त्यांच्या विधानाममुळे संजय जाधव चर्चेत आले.  

खासदार संजय जाधव यांच्या एका कार्यकर्त्यांचे रेशन दुकान काही कारणास्तव बंद करण्यात आले. यावरुन जाधव यांनी भूजबळ यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त करीत ''माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ घेण्यात आला. शिवसेनेचा मेळावा होता. यात कार्यकर्त्यांना रोष व्यक्त केला होता. कार्यकर्त्यांना भावना मी व्यक्त केली. त्यावेळी मी यावर बोललो. पण माझा हेतू कुणाच्या भावना दुखावण्याच्या नव्हत्या. जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. भूजबळसाहेब आमचे नेते आहेत.''

 
शिनसेनेचे खासदास जाधव म्हणाले, '' मी एखादी भूमिका घेतली की काही लोकांच्या पोटात पोटशूळ उठते.  जिल्हाधिकारी बदली माझ्या सांगण्यावरुन झाली नाही,  नवीन जिल्हाधिकाऱ्यांचे मी स्वागत केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांची शिफारस केली यात माझा काय गुन्हा आहे.''
 
जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची परभणीला बदली करू नका, अशी शिफारस आपण केली होती याची कबुलीही जाधव यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात बोलतांना दिली. गोयल जिल्हाधिकारी नको, अशी भूमिका घेऊन मुंबईत ठाण मांडून बसलेल्या जाधव यांच्या प्रयत्नांना यशही आले, मुख्यमंत्र्यांनी गोयल यांना परत मुंबईत बोलावून घेतले होते. (Shivsena Mp Sanjay Jadhav, Parbhani) पण राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलीक व राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा केला.

खुद्द मुख्यमंत्र्यांनी गोयल यांची बदली रद्द केल्यामुळे हा विषय आता महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दरबारी नेल्याशिवाय मार्गी लागणार नाही, हे या दोघांनीही ओळखले. फौजिया खान यांनी दिल्लीत लोकसभेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे तिथेच शरद पवारांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. (Ncp Maharashtra) पवारांनी देखील तो गांभीर्याने घेत अजित पवारांना त्यात लक्ष घालायाला सांगितले आणि आपण स्वतः मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात बोलू असे सांगतिले. ते मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि गोयल यांची पुन्हा परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली.परभणीचे शिवसेना खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी काल मतदारंसघातील घनसांवगी येथे बोलतांना राष्ट्रवादी काॅंग्रेसला आम्ही कधीही बूडवू असा दम भरला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.