शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या की आत्महत्या ?.. मायमर हॅास्पीटलसमोर शिवसैनिकांचे आंदोलन

सोमनाथ हुलावळे यांनी आयसीयू वार्डमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या की आत्महत्या ?.. मायमर हॅास्पीटलसमोर शिवसैनिकांचे आंदोलन
Sarkarnama Banner - 2021-05-10T165724.684.jpg

तळेगांव दाभाडे  :  मावळ मधील  तळेगाव दाभाडे Talegaon Dabhade येथील मायमर हॉस्पिटल Mymer Hospital प्रशासनाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात मावळ शिवसेनेने आंदोलनाचे पाऊल उचलले या रुग्णालयावर गंभीर आरोप करून हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तालुक्यातील शिवसैनिकांनी मागणी केली. हॅास्पिटल प्रशासनाविरोधात आज शिवसेनेने आंदोलन केले.  Shiv Sena agitation in front of Mymer Hospital at Talegaon Dabhade

शिवसेनेचे माजी पदाधिकारी सोमनाथ हुलावळे यांना कोरोनाची लागण झाल्याने एक मे रोजी त्यांना मायमर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांनी काल नऊ  तारखेला आयसीयू वार्डमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं. पण कोरोनातून बरे होत असताना ते आत्महत्या का करतील ? त्यांचा घातपात झालाय, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. 

शिवसैनिकाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळतो. तेव्हा आयसीयूमधून ते स्टोअर रूम मध्ये कसे काय पोहचले ? आयसीयूमध्ये कार्यरत कर्मचारी तेव्हा कुठे होते ? असे प्रश्न उपस्थित करत ही आत्महत्या भासवली जात आहे. पण ही हत्या आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे. तळेगांव दाभाडे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. तर दुसरीकडे हॉस्पिटल प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावलेत, यात काही तथ्य नसल्याचे मायमर मेडिकल कॉलेज प्रशासनाचे म्हणणे आहे. शिवसेनेचे मावळ अध्यक्ष राजू खांडभोर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. 

बील न दिल्याने मायमर मेडिकल कॉलेजच्या कोविड केअर सेंटरने कोरोना मृतदेह तीन दिवस ताब्यात न देता कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवल्याचा आरोप काही दिवसापूर्वी मृताच्या नातेवाईकांनी केला होता.  मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना  हा धक्कादायक प्रकार समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सेंटर चालकांची त्यांनी खऱड़पट्टी काढल्यानंतर हा मतृदेह ते नातेवाईकांकडे देण्यास तयार झाले. घडल्या प्रकाराबद्दल बारणेंनी संताप व्यक्त केला होता. तळेगांव दाभाडे येथील जनरल हॉस्पिटलजवळ मायमर मेडिकल कॉलेज आहे. त्यांनी कॉलेजमध्ये २०० बेडचे कोविड हॉस्पिटल सुरू केले आहे.  
 

Related Stories

No stories found.