शरद पवार-मुख्यमंत्री बैठकीबाबत अजितदादा म्हणाले,.

ही राजकीय चर्चा नसावी. पक्षीय चर्चा असती तर कदाचित आम्हाला बोलावलं असतं,'' असंही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
AjitPawar.jpg
AjitPawar.jpg

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज वर्षा बंगल्यावर बैठक झाली. राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांसोबत बैठक घेतल्यानंतर होणाऱ्या या बैठकीत काय चर्चा होणार याची उत्सुकता लागली आहे.  राज्यातील प्रश्न, महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर होत असलेले आरोप, नेत्यांची नाराजी तसंच महानगर पालिकांच्या निवडणुका यांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याचे समजते. या बैठकीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

अजित पवार म्हणाले की, राज्यातील अनेक जण पवारसाहेबांना भेटत असतात. त्यांच्या काही समस्या मांडत असतात. 'त्या' समस्या राज्याच्या प्रमुखाच्या कानावर घालून काही निर्णय घ्यायचा असेल म्हणून पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असेल.'' अजित पवार यांनी माध्यमांशी बोलत होते.   

भाजपच्या इशाऱ्यावर परमबीर सिंहांचा मंत्र्यांना फसविण्याचा प्रयत्न : नवाब मलिक
''पवारसाहेब मुख्यमंत्र्यांना आज पहिल्यांदाच भेटत नाहीत. पवारसाहेब ५० वर्ष समाजकारण, राजकारण करत असताना त्यांच्या अवतीभवती देशाचं आणि राज्याचं राजकारण फिरत असतं. राज्याच्या प्रश्नाकरीता चारवेळा मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे. महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यावरही पवारसाहेब मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत असेही अजित पवार यांनी सांगितले. ''या बैठकीला मला, जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात यांना बोलावण्यात आले नाही याचा अर्थ ही राजकीय चर्चा नसावी. पक्षीय चर्चा असती तर कदाचित आम्हाला बोलावलं असतं,'' असंही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

मनोहरमामांवर जादूटोणा कायद्याअंतर्गत बारामतीत गुन्हा दाखल 
माळेगाव :  बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव करीत एका व्यक्तीच्या गळ्यातील थायराईड- कॅन्सर बरा करतो, असे सांगून तिघांनी संगणमत करीत रुग्णाच्या कुटुंबियांची दोन लाख ५१ हजार रुपये घेवून फसवणूक केली, हा फसवणूकीचा प्रकार गेल्या तीन वर्षांपासून सुरू होता. त्या प्रकरणी शशिकांत सुभाष खरात Shashikant Kharat ( वय 23, व्यवसाय मोबाइल दुरुस्ती दुकान,  रा. साठेनगर, कसबा बारामती) यांनी तिघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात फिर्य़ाद दिली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in