त्या १२ जणांच्या यादीत तालिबानकडून प्रशिक्षण घेऊन आलेले नाहीत!

लवकरच राज्यपाल १२ आमदारांचा निर्णय निकाली लावतील.
त्या १२ जणांच्या यादीत तालिबानकडून प्रशिक्षण घेऊन आलेले नाहीत!
Sanjay Raut .jpg

मुंबई : विधान परिषदेवरील रखडलेल्या नियुक्त्या लवकरात लवकर कराव्यात यासाठी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि काँग्रेस नेते व राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. भेटीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Sanjay Raut said on the list of 12 MLAs) 

राऊत मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राऊत म्हणाले, भेटीनंतर राज्यपालांनी त्यांचा निर्णय कृतीतून दाखवला. हसरे फोटो प्रसिद्ध झाल्याने वातावरण प्रसन्न होते. त्यामुळे लवकरच राज्यपाल १२ आमदारांचा निर्णय निकाली लावतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. राज्यपालांवर राजकीय दबाव असेल तर त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. भेटीनंतर राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, असल्याचे राऊत यांनी सांगितले. 

राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष कधीही झाला नाही. तो यानिमित्ताने का होतोय याचा विचार झाला पाहिजे. मंत्रिमंडळाने दिलेल्या नावांना राज्यपालांनी मंजुरी देणे हे त्यांचे काम आहे. जी 12 नाव मंत्रिमंडळाने दिली ती काय तालिबान कडून प्रशिक्षण घेऊन आलेले नाही किंवा गुंडही नाहीत. यामध्ये साहित्यिक, सामाजिक क्षेत्रातील नाव आहेत. त्यामुळे राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा. असे राऊत म्हणाले. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना राऊत म्हणाले, त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. महाराष्ट्रा पुढे खूप मोठी कामे आहे. देशात पहिल्या पाच मध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव आहे हे विरोधी पक्षातील नेत्यांचे दुःख मी समजू शकतो, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. शिवसेनचा इतिहास सर्वांना माहीत आहे. शिवसैनिक कधीही पाठीत खंजीर खुपसत नाहीत. बंद दाराआड काय झाले होते आणि तिथून शब्द कसे फिरवले गेले त्या चर्चेत आता आम्ही जात नाही. महाराष्ट्रातले वातावरण आता वेगळे आहे, असेही राऊत यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.