भाजप वसंतदादांच्या नातवाला विकत घेण्याइतका मोठा नाही! 

सांगलीचे खासदार हे काही बोलत नाहीत.आणि त्यांना बोलताही येत नाही
भाजप वसंतदादांच्या नातवाला विकत घेण्याइतका मोठा नाही! 
02WhatsApp_20Image_202020_08_13_20at_207.27.19_20PM.jpeg

सांगली : ''वसंतदादा घराण्याला विकत घ्यायला भाजपला अजून खूप घोटाळे करावे लागतील, वसंतदादांचे विचार पैशाने निर्माण झाले नाही, त्यांच्या विचारांनी गर्दी होते, असे सांगत विशाल पाटील यांनी भाजपवर टीका केली.  ते सांगलीमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष पदाची जबाबदारी विशाल पाटील  Vishal Patil यांच्यावर सोपविण्यात आली आहे.


विशाल पाटील म्हणाले, ''मला बाहेरच्या पक्ष्यातून खूप फोन आले. भांडण लागली काँग्रेस मध्ये पण मी मागच्या वेळी सुद्धा सांगितले होते की भाजपला अजून खूप घोटाळे करावे लागतील अंबानी अदानी तयार करावे लागतील. काही लोक बसले  देश चालवतात म्हणजे त्याचा जुना राग काढत आहेत. या स्वातंत्राच्या लढाईत ही आरएसएसची चड्डी घातलेली लोक इंग्रजांबरोबर होते. दुर्देवाने आपल्या नाकारते पणामुळे त्यांना दिल्लीचे तक्त मिळाले आहे. ते दिल्लीचे तक्त काढून घ्यायचे असल्याने आपल्याला प्रदेश उपाध्यक्षपद दिले आहे.''

राष्ट्रवादीच्या तीन बड्या नेत्यांच्या जावयांचा पोलिसी पाहुणचार
''यापुढील काळात कार्यकर्ते आणि स्वतःच्या ताकतीच्या जोरावर पद आणि उमेदवारी मिळवू,असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला आहे.  ''सध्या अदानी आणि अंबानी देश चालवतात.. त्यात आपले सांगलीचे खासदार हे काही बोलत नाहीत.आणि त्यांना बोलताही येत नाही,'' अशी टीका भाजप खासदार संजय काका पाटील Sanjay Kaka Patil यांच्यावर  विशाल पाटलांनी केली..

सांगली काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा निवडीवरून काँग्रेसमध्ये असणारी गट बाजी उफाळून येणार असे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले होते. अध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये वसंतदादा घराण्याचे विशाल पाटील आणि मंत्री विश्‍वजित कदम गटाचे आमदार विक्रम सावंत हे दोघे होते. मात्र आमदार विक्रम सावंत यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली, तर विशाल पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षपदी वर्णी लागली त्यामुळे विशाल पाटील आणि दादा गटाने या निवडीवरून नाराजी व्यक्त करत वेगळ्या भूमिकेचा पवित्रा घेतला होता. विशाल पाटील हे काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ? या निवडीनंतर पहिल्यांदाच सांगलीत विशाल पाटील बुधवारी दाखल होत असल्याने  वसंतदादा गटाने दिशा संवाद कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. 

या मेळाव्याच्या माध्यमातून हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये विशाल पाटील यांनी राज्यातली आणि देशातली काँग्रेसची असणारी परिस्थिती मांडली. पक्षाने आपल्यावर जी जबाबदारी दिली आहे, ती घेऊन पुढे जायचं का ? याबाबत कार्यकर्त्यांशी संवाद साधत, दिलेली जबाबदारी घेऊन काँग्रेस पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने काम करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांच्या सोबत त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कदम आणि दादा गट यांच्यात जिल्हाध्यक्षपदाचा निवडीवरून सुरू असलेली गटबाजीला आता पूर्णविराम मिळाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.