संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली आज सर्वपक्षीय नेते राष्ट्रपतींना भेटणार

मराठा समाजाच्या आरक्षणाचा पेच सोडवण्यासाठी राष्ट्रपतींना विनंती केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली आज सर्वपक्षीय नेते राष्ट्रपतींना भेटणार
0222Sambhaji_20Raje_0.jpg

नवी दिल्ली  : खासदार संभाजी छत्रपती MP Sambhaji Raje यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षणासाठी आज महाराष्ट्रातील सर्वपक्षीय‌ नेते एकत्रितपणे राजधानी दिल्लीत बाजू मांडणार आहेत. या प्रश्नी सर्वपक्षीय नेत्यांचे एक शिष्टमंडळ दुपारी चार वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे.  मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली जाणार आहे.

राष्ट्रपतींना एक निवेदन देण्यात येणार आहे. मराठा समाजाची स्थिती, त्यांना आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या घडामोडी, मराठा आरक्षणातील कायदेशीर पेच आदी बाबी राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून दिल्या जाईल. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाचा पेच सोडवण्यासाठी राष्ट्रपतींना विनंती केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राष्ट्रवादीच्या तीन बड्या नेत्यांच्या जावयांचा पोलिसी पाहुणचार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना‌ चव्हाणVandana Chavan, खासदार संभाजी राजे छत्रपती, काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, भाजपचे खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि शिवसेनेचे विनायक राऊत‌ हे या शिष्टमंडळात आहेत. दुपारी चार वाजता ही भेट नियोजित आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी या भेटीत प्रामुख्याने केली जाणार आहे.

केंद्र सरकारने इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाची सूची तयार करण्याचे अधिकार राज्यांना बहाल करणारे विधेयक संमत केले आहे. मात्र ५० टक्के आरक्षणाची मर्यादा असल्याने मराठा समाजाला आरक्षण देण्यात अडचणीत आहेत, हे राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून दिले जाणार आहे. केंद्राने आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटाला दहा टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली जाणार आहे.

Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.