मुख्यमंत्री ठाकरे आणि संभाजी भिडे यांच्यात बंद खोलीत चर्चा; माहिती देण्याचे टाळले

भिडे सभागृहाच्या शेजारीच असणाऱ्या भूसंपादन कार्यालयात सुमारे तासभर प्रतीक्षा करत होते.
मुख्यमंत्री ठाकरे आणि संभाजी भिडे यांच्यात बंद खोलीत चर्चा; माहिती देण्याचे टाळले
Sambhaji Bhide meet to Chief Minister Uddhav Thackeray

सांगली : महापुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (ता. २ ऑगस्ट) सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जिल्ह्यातील नुकसानाचा आढावा घेतल्यानंतर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंद खोलीत चर्चा केली. मात्र, या चर्चेची माहिती प्रसार माध्यमांना देण्याचे भिडे यांनी टाळले. (Sambhaji Bhide meet to Chief Minister Uddhav Thackeray)

सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात पाहणीसाठी मुख्यमंत्री ठाकरे आज सांगली दौऱ्यावर होते. ठाकरे यांनी सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाची आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. मात्र, यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी संभाजी भिडे सभागृहाच्या शेजारीच असणाऱ्या भूसंपादन कार्यालयात सुमारे तासभर प्रतीक्षा करत होते. 

बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजी भिडे यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली. मुख्यमंत्री ठाकरे आणि भिडे यांच्यामध्ये काही मिनिटे चर्चा झाली. दोघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा सुरु होती, हे कुणालाही समजले नाही. मात्र या चर्चेनंतर मुख्यमंत्री व भिडे खोलीतून बाहेर आले. मात्र, भिडे यांनी काय चर्चा झाली, याबाबत प्रसारमाध्यमांना स्पष्टीकरण देण्याचे टाळले.

पूर रोखण्यासाठी नद्यांना भिंती घालण्याचा निर्णय विचार करूनच घेऊ

महापूर रोखण्यासाठी नद्यांना भिंती घालण्याच्या पर्यायावर विचार करुन निर्णय घेतल जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले. महापूर रोखण्यासाठी नद्यांवर भिंती घालण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, पूर रोखण्यासाठी नद्यांना भिंती घालण्याबाबत कोल्हापूर येथे दौऱ्यात स्पष्ट भूमिका जाहीर केली होती, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, याबाबत मी माझे वैयक्तीक मत व्यक्त केले असले तरी त्यावर सर्वांशी चर्चा करुन निर्णय अंतिम निर्णय घेतला जाईल. नदीवर एखाद्या ठिकाणी भिंत बांधली तर त्यानंतर कुठे-कुठे पाणी शिरेल आणि जिथे, जिथे पाणी जाऊ शकते, त्या सर्व शक्यतांचा विचार केला जाईल. सर्वांशी चर्चा झाल्याशिवाय हा निर्णयावर निर्णय घेतला जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा महापूर रोखण्यासाठी नद्यांवर भिंती घालण्यासाठीचा आग्रह आहे.

Related Stories

No stories found.