आरटीआय कार्यकर्ता निघाला खंडणीखोर; अधिकाऱ्याची कॉलर पकडून मागितले 10 लाख  
Ganesh Boddu .jpg

आरटीआय कार्यकर्ता निघाला खंडणीखोर; अधिकाऱ्याची कॉलर पकडून मागितले 10 लाख  

मी तुमच्या मंत्रालयाला कामाला लावलेला माणूस आहे.

पिंपरी : माहिती अधिकार कायद्याचा (RTI activist) दुरुपयोग होत असल्याचे आणि त्याचा वापर खंडणी वसूलीसाठी हत्यार म्हणून कसा केला जात आहे, त्याचे ढळढळीत उदाहरण सोलापूरमध्ये समोर आले आहे. तेथील सहाय्यक कामगार आयुक्तांकडेच दहा लाख रुपयांची खंडणी व महिन्याला पन्नास हजार रुपये हफ्ता मागणारा आरटीआय कार्यकर्ता गणेश ज्ञानोबा बोड्डू याला सोलापूरातील फौजदारी चावडी पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात शुक्रवारी (ता.६)  अटक केली. त्याने कामगारमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि कामगार राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. (RTI activist demands Rs 10 lakh ransom) 

मी तुमच्या मंत्रालयाला कामाला लावलेला माणूस आहे, असे सांगत बूड्डूने दोन्ही मंत्र्यांचा एकेरी उल्लेख करण्याचे धाडस केले. तो मुश्रीफ आणि त्या कडूच्या हकालपट्टीची मागणी केलेला माणूस आहे मी असे तो उर्मटपणे बोललेला आहे. आता बघतो तुम्ही कसे सोलापूरात राहता. तुमची मुंबईत साइड पोस्टिंगला बदली करीन,असे सहाय्यक कामगार आयुक्त निलेश लक्ष्मण येलगुंडे (वय ३४) यांना धमकावत बोड्डू याने खंडणीसह महिना हफ्त्याची मागणी केली होती. कामगार कल्याण केंद्र, दमानीनगर येथील येलगुंडेंच्या कार्यालयात जाऊन त्याने या क्लासवन अधिकाऱ्याची कॉलर पकडून त्यांना धमकी देण्याचे धाडस गुरुवारी (ता.५) दाखवले होते. 

राज्याचे कामगारमंत्री व कामगार राज्यमंत्र्यांच्याच हकालपट्टीची मागणी केल्याने या खळबळजनक प्रकरणाकडे राज्याचे लक्ष लागले होते. त्याचे तपासाधिकारी दिपक बुरडे यांनी याबाबत 'सरकारनामा'ला माहिती दिली. बोड्डूने याअगोदरही त्रयस्थांमार्फत येलगुंडे यांच्याकडे खंडणी व हफ्ता मागितला होता. पण, त्याला दाद न दिल्याने तो ५ तारखेला सकाळी थेट त्यांच्या कार्यालयात गेला. तेथे त्याने त्यांची कॉलर पकडून पुन्हा धमकावत खंडणी व हफ्ता मागितला. मुश्रीफ व कडूंच्या हकालपट्टीची मागणी मी केली आहे. 

आता बघतो तुला इथे कोण ठेवतो ते. मंत्रालय, पण माझ्या दबावाखाली आहे. ते तुला सोलापूरातून उचलून फेकतील, असे म्हणत दहा लाख रुपये खंडणी व महिन्याला पन्नास हजार रुपये हफ्ता बूड्डूने येलगुंडे यांच्याकडे मागितला होता. माझ्याकडून काही त्रास नको असेल, तसेच मी इकडे फिरकायला नको असेल तसेच तक्रारी मागे घेण्यासाठी खंडणी व हफ्ता द्यावाच लागेल, असे त्याने धमकावले होते. मात्र, त्याला नकार देताच धावून येत त्याने येलगुंडेंची कॉलर पकडली. इतर कर्मचाऱ्यांनी त्यांची बूड्डूच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर बघून घेतो, असे म्हणत तो निघून गेला होता. 

येलगुंडेंविरुद्ध त्यांच्या वरिष्ठांकडे बुड्डूने अनेक तक्रारी केल्या होत्या. त्यांची वैयक्तिक माहिती आरटीआयखाली मागून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्नही केला होता. येलगुंडेविरुद्ध कारवाई करीत नाहीत म्हणून दोन्हा मंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी त्याने केली होती.

Related Stories

No stories found.