जेडीयूच्या तक्रारीनंतर तेजस्वी यादव अडचणीत 

बिहारमधील राजकीय वातावरण तापलं आहे
जेडीयूच्या तक्रारीनंतर तेजस्वी यादव अडचणीत 
Sarkarnama (92).jpg

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे Rashtriya Janata Dal नेते, विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव Tejaswi Yadav यांनी महिलांना पैसे वाटल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने बिहारमधील राजकीय वातावरण तापलं आहे. यावरुन संयुक्त जनता दलाते नेते JDU, माजी मंत्री नीरज कुमार यांनी राज्य निवडणुक आयोगाकडे तक्रार केली आहे.  

या पार्श्वभूमीवर राजदचे नेते चितरंजन गगन यांनी सांगितले की, जेडीयूच्या नेत्यांनी पंचायत समिती निवडणुकीतील आचारसंहिताबाबत अभ्यास करणे गरजेचे आहे. भाजपने त्याला आचारसंहितेचा भंग केल्याचे म्हटलं आहे. तर निवडणूक आयोगाने तक्रारीबाबत चैाकशी केली जाईल, असे म्हटले आहे. ''गोपालगंज जिल्हातील बैकुंठपुर परिसरात महिलांना तेजस्वी यादव पैसे वाटत होते,'' असा आरोप चितरंजन गगन यांनी केला आहे. 

आमदार प्रेम शंकर यांच्या गावात तेजस्वी यादव यांनी महिलांतची भेट घेतली. याचा व्हिडिओ राजदने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तेजस्वी यादव महिलांना पैसे वाटत असल्याचे दिसत आहेत. निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याचे या व्हिडिओवरुन दिसते. ग्रामीण भागात आचारसंहितेचा लागू केल्यानंतर त्यांचे उल्लघंन करणाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी राजदने पत्र लिहून निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

Dyspचे महिला कॉन्स्टेबल सोबत स्वीमिंग पूलमध्ये अश्लील चाळे viral video
नवी दिल्ली : राजस्थानच्या उदयपुर मधील एका रिसॉर्टमध्ये महिला पोलिस शिपाई सोबत डीएसपी अश्लील चाळे करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वीमिंग टॅंकमध्ये डीएसपी आणि महिला पोलीस शिपाई अश्लील चाळे करत आहेत. सोबत महिलेचा सहा वर्षांचा मुलगा आहे. हा  व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी उदयपूर येथील रिसॉर्टवर छापेमारी करत निंलबित डीएसपी हिरालाल सैनी DySP Hiralal Saini याला अटक केली आहे.
Edited by : Mangesh Mahale 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.