पारनेरमधील महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित

नागरिकांची महसूल विभागातील कामे व्हावीत यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तहसीलदार देवरे व महसूल कर्मचारी, तलाठ्यांना चर्चेसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावले आहे.
पारनेरमधील महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित
jyoti devare.jpg

अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर मनमानी कारभार व दडपशाहीचा आरोप करत पारनेर तालुक्यातील महसूल विभागातील कर्मचारी व तलाठ्यांचे 25 ऑगस्टपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. तहसीलदार देवरे यांची बदली करा अथवा आमच्या सर्वाच्या पारनेर तालुक्या बाहेर बदल्या करा अशी महसूल कर्मचाऱ्यांची मागणी आहे. या आंदोलनामुळे पारनेर तालुक्यातील महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे.

पारनेर तालुक्यातील महसूल कर्मचारी व तलाठ्यांच्या आंदोलनामुळे कामे होत नसल्याने तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी आंदोलन केले. नागरिकांची महसूल विभागातील कामे व्हावीत यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तहसीलदार देवरे व महसूल कर्मचारी, तलाठ्यांना चर्चेसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावले आहे. 

हेही वाचा...

त्यानुसार तहसीलदार देवरे व महसूल कर्मचारी, तलाठी आज सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांना भेटले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजू जाणून घेतल्या. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित व श्रीगोंदे-पारनेर प्रांत सुधाकर भोसले उपस्थित होते. 

जिल्हाधिकाऱ्यांनी पारनेर तालुक्यातील महसूल कर्मचारी व तलाठी यांना तहसीलदार देवरे यांची एक महिन्यात चौकशी करून योग्यती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार महसूल कर्मचारी व तलाठी यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली. 

उद्यापासून पारनेर तालुक्यातील महसूल विभागातील सर्व कर्मचारी व तलाठी आपल्या कार्यालयात कर्तव्य बजावताना दिसणार आहेत. या निर्णयामुळे नागरिकांचे महसूल विभागातील कामे मार्गी लागतील. पारनेर तालुका महसूल कर्मचारी व तलाठी संघटनेकडून आंदोलन स्थगिती बाबत दुजोरा दिला आहे.


नगरमध्ये महापालिका कामगार संघटनेची संपाची हाक

कोरोना कालावधीत कर्तव्य बजावत असताना महापालिकेच्या 19 कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला. एक हजारपेक्षाही जास्त कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय कोरोना बाधित झाले. कोरोनाशी दोन हात करत त्यांनी शहराला कोरोनापासून वाचविण्यात महत्त्वाची भुमिका बजावली. 

महापालिकेत तीन हजार कर्मचारी आहेत त्यातील एक हजार 850 कर्मचारी कायम स्वरूपी आहेत. मागील वर्षी कोरोनामुळे दिवाळी सानुग्रह अनुदान दोन टप्प्यात व महागाईच्या मानाने कमी मिळाले होते. यंदा दिवाळीत प्रत्येक कर्मचाऱ्याला किमान 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे, अशी मागणी अहमदनगर महापालिका कामगार संघटनेने करत 19 सप्टेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा महापालिका प्रशासनाला आज दिला, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे व सचिव आनंदराव वायकर यांनी दिली. महापालिकेच्या तिजोरीत पुरेसे पैसे नसल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.