पारनेर तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी अण्णा हजारें समोर मांडल्या व्यथा

आज दुसऱ्या दिवशी सायंकाळी तालुक्यातील महसूल, आरोग्य व ग्रामविकास विभागाच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी भेट घेत आपल्या व्यथा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे राळेगणसिद्धी येथे येऊन मांडल्या.
पारनेर तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी अण्णा हजारें समोर मांडल्या व्यथा
ralegonan.jpg

राळेगणसिद्धी : तहसीलदार ज्योती देवरे यांच्या दडपशाहीविरोधात बेमुदत आंदोलन सुरू केल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी सायंकाळी तालुक्यातील महसूल, आरोग्य व ग्रामविकास विभागाच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी भेट घेत आपल्या व्यथा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे राळेगणसिद्धी येथे येऊन मांडल्या. 

यावेळी हजारे यांच्या भेटीला आलेल्या शिष्टमंडळाने त्यांना निवेदन दिले. आम्ही दिलेले निवेदन अण्णा वाचतील आमच्या मागण्या योग्य वाटल्या तर त्यावर ते निर्णय घेतील. आमचं आंदोलन आम्हांला न्याय मिळेपर्यंत सुरूच राहणार आहे, अशी माहिती महसूल संघटनेचे संतोष मांडगे यांनी सरकारनामाशी बोलताना दिली.

हेही वाचा...

मांडगे म्हणाले की, शेतकरी तसेच नागरिकांच्या कामांची तहसील कार्यालयातील काम बंद आंदोलनामुळे अडचणी येणार आहेत मात्र त्याबाद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. मात्र आम्हांला अन्याय सहन न झाल्यामुळे हे पाऊल उचलावे लागले असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी संतोष मांडगे, महेंद्र रोकडे, मच्छिंद्र उंडे, पंकज जगदाळे, यांच्यासह आरोग्य व ग्रामविकास विभागाच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी हजारे यांची भेट घेत आपल्या अडचणी व व्यथा मांडल्या. 

मी या वादात पडणार नाही, असे मी या अगोदरच सांगितले आहे. मात्र अन्याया विरोधात आवाज उठविणे हा दोष नाही, अन्याया विरोधात लढणे योग्य आहे. तुम्ही तुमच्या पध्दतीने तुमच्या मागण्या या वरिष्ठांकडे मांडा.
- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

 

शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशासाठी तलाठी यांच्याकडून आवश्यक असणारे सर्व कागदपत्र आमच्याकडून दिले जातील. त्यांना निश्चितच आमचे सहकार्य  राहील. तसेच आता सर्वत्रच डिजिटल सात बारा, आठ अ व फेरफार मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची काम करताना जास्त अडचणी येणार नाही. मात्र अडचणी आल्या तर आम्ही सर्व त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. 
- संतोष मांडगे, अध्यक्ष, महसूल संघटना, पारनेर

Edited By - Amit Awari

Related Stories

No stories found.