32 गावांतील आदिवासींच्या जमिनी घेण्याचा महसूल व वनविभागाने घातला घाट
andolan.jpg

32 गावांतील आदिवासींच्या जमिनी घेण्याचा महसूल व वनविभागाने घातला घाट

आदिवासींनी आज पोळा सणसाजरा न करता राजूर येथे एकत्र येऊन माजी मंत्री मधुकर पिचड यांची भेट घेतली. तसेच तहसीलदार कार्यालयावर मोर्चा नेला.

अकोले : महसूल प्रशासनाकडे रोज असंख्य कागदपत्रे येतात. एखाद वेळेला त्यात चूक झाल्यास नागरिकांना त्याचा फटका बसू शकतो. पण महसूल प्रशासनाने त्यांची चूक वेळेत सुधारली नाही तर नागरिकांना त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.

अकोले तालुक्यातील राजूर- भंडारदरा परिसरातील वन्यजीव क्षेत्रातील असलेल्या गावांतील 7/12 उताऱ्यावरचे खासगी व्यक्तीची नावे महाराष्ट्र शासन संरक्षित वन अशी नोंद करण्याचा आदेश तहसीलदार कार्यालयाने मंडल अधिकारी यांना दिल्याने आदिवासी शेतकरी संकटात सापडले आहेत. या संदर्भात 32 गावातील आदिवासी शेतकऱ्यांनी तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी व प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. आदिवासींनी आज पोळा सण साजरा न करता राजूर येथे एकत्र येऊन माजी मंत्री मधुकर पिचड यांची भेट घेतली. तसेच तहसीलदार कार्यालयावर मोर्चा नेला. 

हेही वाचा...

ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही भंडारदरा गावचे शेतकरी आहोत. वन विभागाच्या ज्या जमिनी यात आलेल्या आहेत त्या अटी शर्तीवरती कायम वहिवाटीस दिलेल्या आहेत. असा फेरमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. तरी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभाग अधिसूचनेप्रमाणे आमच्या नावे असलेला 7/12 व खासगी मालक, मूळ मालक म्हणून जो उल्लेख आहे. त्या ऐवजी इतर हक्कामध्ये नोंद करण्याचे आदेश अकोल्याचे तहसीलदारांनी दिलेले आहेत. याला सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे.

आम्हाला दिलेली जमीन ही अभयारण्य घोषित करण्यापूर्वी वाटप करण्यात आलेली आहे. भंडारदरा धरण बांधल्यानंतर आम्ही गावचे शेतकरी पूर्णपणे भूमिहीन झाल्याने त्या जमिनी आम्हाला दिलेल्या आहेत. आमचे यापूर्वी स्थलांतर झालेले आहे, तोच आमच्यावरती अन्याय झाला असताना आज पुन्हा आमच्या ताब्यातील काढून घेण्याचा घाट घातला जात आहे. याचा आम्ही विरोध करतो, असे निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा...

निवेदनावर शंभर शेतकऱ्यांच्या स्वक्षऱ्या आहेत. सरपंच चंद्र प्रभा बांडे, सरपंच सयाजी अस्वले, सरपंच चंद्रकांत गोंदके, सरपंच विजय भांगरे, सरपंच पांडुरंग खाडे, सरपंच तुकाराम खाडे, गंगाराम धिदले, त्रिंबक बांडे, विष्णू बांडे, दिलीप रगडे, पांडू सोंगाल आदींच्या यात स्वाक्षऱ्या आहेत.

Related Stories

No stories found.