प्रदेश कॉंग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांना तात्काळ हटवा!

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये पक्षात सक्रीय नसलेल्या तसेच कामकाजाचा कोणताही अनुभव ऩसलेल्यांचा समावेष करण्यात आला आहे. त्यांचा आगामी महपालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काहीही उपयोग होणार नाही.
प्रदेश कॉंग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांना तात्काळ हटवा!
Yashomati Thakur

नाशिक : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. (Recently state congress executive appointments declaire) यामध्ये पक्षात सक्रीय नसलेल्या तसेच कामकाजाचा कोणताही अनुभव ऩसलेल्यांचा समावेष करण्यात आला आहे. (It Incluedes inactive party workers) पक्षाच्या कामकाज व कार्यक्रमांत सक्रीय नसलेल्यांचा त्यात समावेष झाल्याने त्यांचा आगामी महपालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकांसाठी त्याचा काहीही उपयोग होणार नाही, (It will not at all usefull for party in NMC as well ZP elections) अशी तक्रार शहरातील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आज राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Minister Yahomati Thakur) यांच्याकडे केली.

नाशिक शहर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रदेश समितीतील नियुक्त्यांमुळे तीव्र नाराजी होती. त्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याची दखल घेऊन वरिष्ठ पदाधिकारी व नाना पटोले यांनी मंत्री श्रीमती ठाकूर यांना नाशिकला पाठविले होते. त्यानुसार कार्यकर्ते त्यांना भेटले. यावेळी पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस डॅा शोभाताई बच्छाव, जिल्हा अध्यक्ष डॅा तुषार शेवाळे उपस्थित होते.

यावेळी पक्षाचे सक्रीय पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ज्येष्ठांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. त्यांनी पक्षाच्या कामकाजाला चालना देण्याची गरज आहे. पक्षाकडून नागरिकांच्या विविध प्रश्नांवर आंदोलनातून जनतेचे प्रश्न मांडण्याची गरज आहे. त्यात अनुभवी तसेच पक्षात सक्रीय पदाधिकारी असले तरच त्याचा उपयोग होईल. यादृष्टीने वरिष्ठ नेत्यांनी विचार करायला हवा होता. कोणते पदाधिकारी घ्यावेत याचा विचार करताना किमान नाशिक शहर व जिल्ह्यातील राजकीय स्थिती, पक्षाची संघटनात्म स्थिती व सध्याचे शहराचे व नागरिकांचे प्रश्न माहिती असलेल्यांना विचारात घेतले असते तर त्याचा निश्चितच उपयोग झाला असता.तसे झाले नाही.

हा एकप्रकारे व शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व पक्षावर देखील अन्याय आहे. असेच वातावरण शहर व जिल्ह्यात पसरले आहे. परिणामी त्याचा पक्षाच्या संघटनात्मक परिस्थितीचा विचार करता नवे पदाधिकारी पक्षाला लाभदायक ठरण्यापेक्षा गैरसोयीचे ठरू शकतात. अनेक कार्यकर्ते पक्षापासून दुरावले जाण्याची शक्यता आहे. त्याचा विचार करून पक्षाच्या ध्येय धोरणानुसार काम केलेल्या अनुभवी व जनमानसात चांगली प्रतिमा असलेल्यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान मिळावे अशी मागणी करण्यात आली.

यावेळी मंत्री ठाकूर यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे मत समजून घेतले. तसेच त्यांना नाराज न होता पक्षाच्या कामात सक्रीय राहण्याच्या सूचना दिल्या. तक्रारींबाबत आपण स्वतः पाठपुरावा करून प्रदेश अध्यक्ष व अन्य नेत्यांच्या कानावर या तक्रारी घालू. पक्षाचा कार्यकर्ता हाच पक्षाचा कण आहे. याबाबत सर्व वरिष्ठ नेते तक्रारीची निश्चित दखल घेतील असे स्पष्ट केले.

यावेळी नगरसेविका वत्सला खैरे, नगरसेविका आशा तडवी, आण्णा पाटील, नगरसेवक गुलाम ताहीर शेख, भरत टाकेकर, हनीफ बशीर, ज्येष्ठ नेते उल्हास सातभाई, माजी नगरसेवक राजेंद्र बागूल, रईस शेख, सुरेश मारू, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष विजय राऊत, लक्ष्मण धोत्रे, सेवा दलाचे शहर अध्यक्ष वसंत ठाकूर, ज्ञानेश्वर काळे, संदीप शर्मा, स्वप्नील पाटील, उद्धव पवार, कैलास कडलग, जावेद पठाण, तौफीक शेख, अरुण दोंदे, कामील इनामदार, सिद्धांत गांगुर्डे, देवा देशपांडे, भरत पाटील, दिनेश उन्हवणे, अकबर खान, इमरान इन्सारी, शबीर पठाण, आण्णा मोरे, दिनेश निकाळे, सचीन दीक्षित, प्रवीण काटे यांसह मोठ्या संख्येने शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.