तृतीयपंथीयाविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

एका महिला किराणा दुकानदाराकडे तृतीयपंथियाने दोन हजार रुपये मागितल्याची खळबळजनक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली. ते न दिल्याने त्याने दुकानासमोर राडा केला.आरडाओरडा व शिवीगाळ केली. यामुळे घाबरलेल्या महिलेला पोलिसांत धाव घ्यावी लागली.
तृतीयपंथीयाविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल
Trutiypanthi

पिंपरी : एका महिला किराणा दुकानदाराकडे तृतीयपंथियाने दोन हजार रुपये मागितल्याची (Eunuch deemands two thousand rupees to Women Shopkeepar) खळबळजनक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली. ते न दिल्याने त्याने दुकानासमोर राडा केला. (women reject the deemand then Eunuch use abusive words) आरडाओरडा व शिवीगाळ केली. यामुळे घाबरलेल्या महिलेला पोलिसांत धाव घ्यावी लागली. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी (MIDC police register a Ransom case against Eunuch) सदर तृतीयपंथाविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे.तृतीयपंथीयाविरुद्ध खंडणीचा शहरातील हा असा पहिलाच गंभीर व अजामीनपात्र गुन्हा असल्याचे सांगण्यात आल्याने त्याची चर्चा होत आहे.

भोसरी प्राधिकरणातील खंडेवस्तीत हा प्रकार घडला. काल सायंकाळी या महिलेच्या जय माता दी किराण स्टोअरमध्ये आरोपी गेला व त्याने थेट दोन हजार रुपयांची मागणी केली. 

महिलेने शंभर रुपये देण्याची तयारी दर्शवली. मात्र, त्याला त्याने नकार दिला. तर, दोन हजार रुपये देऊ शकत नसल्याचे महिला दुकानदार म्हणाली. त्यावर संतापलेल्या आरोपीने त्यांना व  दुकानातील त्यांच्या मुलीलाही शिवीगाळ केली. हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली. दुकानासमोर आरडाओरड करीत मोठ्याने टाळ्या वाजवल्या.या

मुळे घाबरलेल्या दुकान मालकिणीने पोलिसांत धाव घेतली. हे प्रकरण काहीसे नाजूक असले, तरी आरोपीला शोधून अटक करणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी सरकारनामाला सांगितले. दरम्यान, दर शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर नाहक असा त्रास शहरातील सर्वच दुकानदारांना होत असून भूर्दंडही बसतो आहे.
...
हेही वाचा...

Related Stories

No stories found.