चंद्रशेखर घुले यांच्या वाढदिवसाला रंगला कुस्ती आखाडा

माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील मल्लांसाठी प्रथमच ए.बी.फिटनेस क्लबचे पै.युवराज व अभिजित पंडित भोसले यांच्यातर्फे कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते.
चंद्रशेखर घुले यांच्या वाढदिवसाला रंगला कुस्ती आखाडा
Chandrashekhar ghule.jpg

शेवगाव : माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या वाढदिवसानिमित्त ए.बी.फिटनेस क्लबने तालुक्यात प्रथमच आयोजित  केलेल्या तालुकास्तरीय शेवगाव केसरी कुस्ती स्पर्धेत खुल्या गटातून सागर कोल्हे हा मल्ल विजेता ठरला. त्याने मानाची चांदीची गदा पटकावली आहे. माजी आमदार केसरी हा किताब  महेश लोंढे या मल्लाने पटकाविला. या स्पर्धेतील विजेत्या मल्लांना माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या हस्ते रोख रक्कम ,चांदीची गदा व ट्रांफी देवून सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेनिमित्त शेवगावमध्ये बऱ्याच दिवसांनी कुस्ती आखाडा रंगला. तालुक्यात प्रथमच तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याने पैलवान व कुस्तीप्रेमींसाठी परवणी ठरली. या कुस्ती आखाड्याच्या निमित्ताने आगामी विधानसभा व विधानपरिषदेचाही राजकीय आखाडा रंगल्याची चर्चा शेवगावमध्ये आहे. Rangala Wrestling Arena on Chandrasekhar Ghule's birthday

माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील मल्लांसाठी प्रथमच ए.बी.फिटनेस क्लबचे पै.युवराज व अभिजित पंडित भोसले यांच्यातर्फे कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. न्यू आर्टस महाविद्यालयाच्या मिरी रस्त्यावरील क्रीडा संकुलात या स्पर्धेचा प्रारंभ सोमवारी (ता.१६) माजी आमदार व लोकनेते मारुतराव घुले ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले,पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले, दहीफळ सेवा संस्थेचे अध्यक्ष पंडित भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सहा वजनी गटातून घेण्यात आलेल्या या स्पर्धेत तालुक्यातील १८४ मल्लांनी सहभाग नोंदवला.

हेही वाचा...

सहा गटामध्ये प्रथम व द्वितीय आलेले मल्ल :

३५ते ४० किलो वजनगट ः प्रथम - यश जामदार द्वितीय -अजय गायकवाड,
४० ते ५० किलो वजन गट : प्रथम - वैभव जाधव, व्दितीय -अतुल मोरे.
५० ते ६०किलो वजन गट : प्रथम - विश्वास पंडित, द्वितीय - भारत आवटी.
६० ते ७० किलो वजन गट : प्रथम - राजेंद्र देशमुख, द्वितीय - संकेत देशमुख.
७० ते ८० किलो वजन गट : प्रथम - आकाश काजळे, द्वितीय - सोपान बन.
८० किलो प्लस शेवगाव केसरी गट : प्रथम - सागर कोल्हे शेवगाव केसरी, व्दितीय - अनिल लोणारी 

हेही वाचा...


मुली : प्रथम - पंकजा राजेंद्र बल्लाळ, व्दितीय - तृप्ती नारायण भवर.
प्रथम  -पुनम गाडे, द्वितीय - प्रणाली बल्लाळ 
प्रेक्षकांच्या आग्रहास्तव महाराष्ट्रातील चार मलांच्या प्रेक्षणीय कुस्त्या घेतल्या. यामध्ये
प्रथम : महेश लोंढे ( माजी आमदार केसरीचा मानकरी ठरला.) द्वितीय: मयूर चांगले शिर्डी
दुसरी कुस्ती
मनोज फुले नगर - प्रथम ः व्दितीय सचिन गायकवाड पुणे

तिसरी कुस्ती ः महेश फुलमाळी  नेवासा - प्रथम, द्वितीय सचिन शिर्के- पाथर्डी
चौथी कुस्ती - शिवराज कारले - प्रथम

विजेत्या मल्लांना चंद्रशेखर घुले यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. पंच म्हणुन गणेश दसपुते व शुभम जाधव यांनी काम पाहिले.

Edited By - Amit Awari

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.