कुंभारीचे सरपंच राजेंद्र जाधव यांचे दातृत्व; गावासाठी विहिर खुली केली

सरपंच या नात्याने राजेंद्र जाधव यांनी आपल्या स्वमालकीच्या विहिरीतील पिण्याचे पाणी भाऊसाहेब जाधव यांच्या पाइपलाइनद्वारे गावाला उपलब्ध करून दिल्याने गावाची तहान भागली आहे.
Kumbhari Rajendra Jadhav
Kumbhari Rajendra Jadhav

निफाड : महिनाभरापूर्वीच कुंभारी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व विहिरी व कूपनलिका या जलस्त्रोतांचे पाझर पूर्णपणे (Kumbhari village water supply source became dry) बंद झाल्याने कुंभारी गावाला पाणीटंचाईच्या तीव्र झळा (Village facing Drinking water issue) बसत होत्या. त्यातच गावालगतच असलेल्या पालखेड कालव्याला दीड महिन्यापासून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन आलेले नसल्याने महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू होती. त्यातच सरपंच या नात्याने राजेंद्र जाधव (Sarpanch Rajendra Jadhav open his well) यांनी आपल्या स्वमालकीच्या विहिरीतील पिण्याचे पाणी भाऊसाहेब जाधव यांच्या पाइपलाइनद्वारे गावाला उपलब्ध करून दिल्याने गावाची तहान भागली आहे.

कुंभारी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. तत्काळ पाणी उपलब्ध होईल, अशी कोणतीही उपाययोजना नव्हती. द्राक्षशेती व इतर पिकांना पाणी देत सरपंच राजेंद्र जाधव यांनी आपल्या विहिरीचे पाणी दिल्याने गावाची तहान भागण्यास मदत झाली. तीन हजारांच्या आसपास गावाची लोकसंख्या असल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

दर वर्षी मे, जूनमध्ये कुंभारीला तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसतात. पाण्याची मागणी वाढल्याने या वर्षी त्याचा जास्त परिणाम दिसून आला. दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता नागरिकांची पिण्याच्या पाण्याची मागणी वाढणार आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी गावाला नव्याने पाणीपुरवठा योजना राबविणे गरजेचे आहे.

गावाची सार्वजनिक मालमत्ता असलेल्या जागेत व ज्या ठिकाणी जलस्त्रोतांचे पाझर आजही कार्यन्वित आहेत, अशा ठिकाणी नवीन विहिरींचे खोदकाम करून नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करता येऊ शकतो, असे मत राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केले.

...
काही महिन्यांपासून गावातील बहुतेक विकासकामे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू आहेत. पाणीपुरवठ्याचे कामदेखील लवकरच हाती घेऊन ते पूर्ण केले जाईल.
- भरत कदम, ग्रामसेवक, कुंभारी 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in