भगवती माता मंदिरासमोर राधाकृष्ण विखेंचा शंखनाद : मंदिरे उघडा अन्यथा कुलूप तोडू

सकाळपासूनच मंदिराच्या समोर भजनी मंडळी जमली होती. मृदूंग, टाळ, विणा असा लवाजमा जमविण्यात आला. भाजपचे पंचे गळ्यात लटकवून भाजप कार्यकर्ते जमा झाले.
भगवती माता मंदिरासमोर राधाकृष्ण विखेंचा शंखनाद : मंदिरे उघडा अन्यथा कुलूप तोडू
radhakrishna vikhe patil.jpg

अहमदनगर ः राज्यातील मंदिरे कोरोना नियमांची कारणे देत राज्य सरकारने बंद ठेवली आहेत. या विरोधात भाजप राज्यभर आंदोलने करत आहे. या पार्श्वभूमीवर राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथील भगवती मातेच्या मंदिरासमोर भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दुपारी शंख नाद केला. तसेच परिसरातील भजनी मंडळ व प्रवचनकारांसमवेत भजनही केले. 

सकाळपासूनच मंदिराच्या समोर भजनी मंडळी जमली होती. मृदूंग, टाळ, विणा असा लवाजमा जमविण्यात आला. भाजपचे पंचे गळ्यात लटकवून भाजप कार्यकर्ते जमा झाले. भजन सुरू झाले. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही टाळ हाती घेत भजनात सहभाग घेतला. 

हेही वाचा...

या प्रसंगी राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, गेली पाच महिन्यापासून राज्यातील सर्वच मंदिर बंद आहेत. हॉटेल बियर बार मॉलसाठी सरकारने परवानगी दिली आहे मात्र मंदिर उघडण्यास परवानगी का देत नाही? लवकरात लवकर राज्यातील मंदिर खुले केली नाही तर आम्ही पुढच्या आंदोलनात सरकारची सर्व नियम झुगारून मंदिराचे कुलपे तोडू असा इशारा या वेळी विखे पाटलांनी ठाकरे सरकारला दिला. 


भाजप कार्यकर्त्या सह भाविक मोठया संख्येने आंदोलनात सहभागी झाले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी 'अजब तुझे सरकार उद्धव दार उघड उद्धवा' म्हणत शंख नाद करून राज्य सरकारचा निषेध केला.

Related Stories

No stories found.