नगर तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करा - शिवाजी कर्डिले
pur.jpg

नगर तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करा - शिवाजी कर्डिले

नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई परिसरात काल रात्री जोरदार पाऊस झाला. स्थानिकांच्या मते मुसळधारपाऊस होता.

अहमदनगर ः अहमदनगर शहर व जिल्ह्यात आज जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सर्व ओढे, नाले व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. हवामान विभागाने आणखी चार दिवस पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले जिल्ह्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 

नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई  परिसरात काल रात्री जोरदार पाऊस झाला. स्थानिकांच्या मते मुसळधार पाऊस होता. त्यामुळे मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे नगर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तसेच जेऊरमधील नुकसानग्रस्त व्यावसायिकांच्या दुकानांचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.  

हेही वाचा...

निवेदनात म्हटले आहे की, सीना आणि खारोळी नदीला पूर आला होता या पुराचे पाणी जेऊर बाईजाबाई मधील व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांच्या दुकानात घुसले त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले,आदीच कोरोनाच्या काळात व्यवसायिक मोठ्या अडचणीत सापडला असताना,पुरा मुळे मोठे नुकसान झाले आहे,त्यामुळे जेऊर गावातील व्यवसायिक हवालदील झाला आहे.

आधीच व्यवसायासाठी बँकांकडून कर्ज घेतलेले आहे त्यातच ही नैसर्गिक आपत्ती ओढवल्याने आर्थिक अडचणीत सापडला आहे तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ताबडतोब या व्यावसायिकांच्या दुकानांचे नुकसानाचे पंचनामे करून अर्थसहाय्य करावे तसेच नगर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली उभे पिके पावसाच्या पाण्याने वाहून गेली आहे. तरी या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची ताबडतोब पंचनामे करून शासनाच्या वतीने आर्थिक मदत करावी पुराच्या पाण्यामुळे धनगरवाडी, चापेवाडी, ससेवाडी, तोडमलवाडी, शेटे वस्ती या ठिकाणाचा संपर्क तुटला. 

हेही वाचा...

धनगरवाडी आणि परिसरातील कांदे, मूग, बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व व्यावसायिकांना लवकरात- लवकर आर्थिक सहाय्य शासनाने उपलब्ध करून द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे

50 जणांचे वाचले प्राण
नंदिनी नदीला पूर आल्याने पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव, औरंगपूर व पागोरी पिंपळगाव तसेच शेवगाव तालुक्यातील आखेगाव, वरुर, ठाकुर पिंपळगाव या नदीकाठावरील गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. बचावकार्यासाठी नेवासा पैठण येथून बोट मागविण्यात  आली आहे. आखेगाव येथे नदीला पाणी आल्याने घरात पाणी शिरले आहे, शेकडी घरे पाण्यात आहेत बाबासाहेब पालवे यांची वस्ती पाण्यात गेल्याने असंख्य कुटुंब अडकले आहेत रात्रभर घराच्या गच्चीवर भर पावसात थांबले आहेत. आतापर्यंत 50 जणांना वाचवण्यात महसूल व पोलिस प्रशासनाला यश आले असून 100 नागरिक अजूनही अडकले आहेत. शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील पूर स्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भोसले स्वतः शेवगावमध्ये दाखल झाले आहेत. सध्या ते पूर स्थितीची व झालेल्या नुकसानीची पाहणी करून अधिकाऱ्यांना पंचनामे संदर्भातील सूचना देत आहेत.

Related Stories

No stories found.