राष्ट्रपतींनी मराठा आरक्षणाचा मुद्दा गांभीर्याने ऐकला आणि म्हणाले...

सर्वपक्षीय एकजूट दाखविण्याचा प्रयत्न यशस्वी..
राष्ट्रपतींनी मराठा आरक्षणाचा मुद्दा गांभीर्याने ऐकला आणि म्हणाले...
Sambhajiraje meets president

नवी दिल्ली : खासदार युवराज संभाजीराजे  छत्रपती (Sambhajiraje) यांच्यासह सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मराठा आरक्षणप्रश्नी (Maratha Reservation) राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली. सुमारे 45 मिनिटे झालेल्या या बैठकीत राष्ट्रपतींनी शिष्टमंडळाचे म्हणणे गांभीर्यपूर्वक ऐकत यावर मी अभ्यास करून निर्णय घेतो, असे आश्वासन दिले. 

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि काॅंग्रेसकडून आमदार संग्राम थोपटे यांचा राष्ट्रपतींची भेट घेणाऱ्यांत समावेश होता. 

यावेळी राष्ट्रपतींनी सर्वपक्षीय प्रतिनिधींचे म्हणणे सविस्तरपणे व गांभीर्यपूर्वक ऐकून घेतले व पुढील कार्यवाही करण्यासाठी या विषयावर अभ्यास करणार असल्याचे सांगितल्याची माहिती संभाजीराजे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

१०५ व्या घटनादुरूस्ती नंतर राज्य मागासवर्ग आयोग गठीत करून त्यामार्फत मराठा समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाचा अहवाल तयार करून मराठा समाजास आरक्षण देण्याची जबाबदारी हि राज्य शासनाची आहे. यासाठी ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने असामान्य परिस्थिती सिद्ध करणे गरजेचे आहे. तसेच इंद्रा साहनी खटल्यात सांगितले प्रमाणे ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून आरक्षण देण्यासाठी विशेष अपवादात्मक परिस्थिती म्हणजेच अतिदुरवर आणि अतिदुर्गम परिस्थिती सिद्ध करण्यासाठीचे निकष केंद्र सरकार मार्फत अद्ययावत करण्याची आवश्यकता संभाजीराजे यांनी राष्ट्रपती कोविंद यांच्याकडे व्यक्त केली. तसे शक्य होणार नसेल तर साधा व सोपा मार्ग म्हणजे EWS प्रमाणे ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्यासाठी प्रयत्न करावेत यामुळे देशातील अनेक राज्यांतील आरक्षण प्रश्न सोडविण्यासाठी मदत होईल, असे संभाजीराजे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.