ठाकरे सरकार स्टेअरिंग आणि बदल्यांमध्येच घुटमळतंय : प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल 

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे स्टेअरिंग आणि बदल्यांमध्येच घुटमळत आहे. सरकारमधील सहभागी पक्ष हे एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षांत स्पर्धा सुरू आहे. मी मोठा. तुझे यश की माझे यश यावरूनच या पक्षांमध्ये लुटूपुटूची लढाई सुरू आहे.
ठाकरे सरकार स्टेअरिंग आणि बदल्यांमध्येच घुटमळतंय : प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल 
Praveen Darekar criticizes Thackeray government

पुणे : ‘‘राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे स्टेअरिंग आणि बदल्यांमध्येच घुटमळत आहे. सरकारमधील सहभागी पक्ष हे एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षांत स्पर्धा सुरू आहे. मी मोठा. तुझे यश की माझे यश यावरूनच या पक्षांमध्ये लुटूपुटूची लढाई सुरू आहे,’’ असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर केला. 

पुणे जिल्ह्यातील करंजविहिरे (ता. खेड) हद्दीतील थोपटवाडी येथे आरती कलवडे (वय १७) या तरुणीचा तीन दिवसांपूर्वी विवस्त्र करून डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. त्या पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी दरेकर हे रविवारी (ता. २६ जुलै) आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पीडित कुटुंबावर होत असलेली दहशत ही माणुसकीला काळिमा फासणारी आहे. अशा विकृत मनोवृत्तीला ठेचून काढण्याची गरज आहे, असेही दरेकर या वेळी म्हणाले. 

घटना घडून तीन दिवस झाल्यानंतरही पालकमंत्री अजित पवार यांनी भेट दिली नाही, या प्रश्नावर दरेकर म्हणाले की या सरकारमध्ये संवेदनशीलता दिसत नाही. गृहमंत्री अनिल देशमुख शनिवारी (ता. २५ जुलै) पुण्यात येतात. मात्र पुणे शहराला लागून असलेल्या खेड तालुक्यातील या कुटुंबांना ते भेटायला आले नाहीत. खरं त्यांनी आपली जबाबदारी ओळखून समाजाला संदेश देण्याची गरज होती. 

सरकारमधील सद्यस्थितीवर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की ‘कोण ड्रायव्हर आहे. कोण मागे बसले आणि कोणी पुढे बसले आहे, याचे उत्तर आगामी काळच देईल. आम्हाला जनतेचे प्रश्न महत्त्वाचे वाटतात. कोविडसारख्या प्रश्नावर मी आणि माजी मुख्यमंत्री तथा विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिवस-रात्र राज्यात फिरत आहोत. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सेवाभावी भावनेतून या प्रश्नावर काम करत आहेत. त्यामुळे गरीब कुटुंबांवर अन्याय होतो, त्यावेळी आम्ही धावून येतो. खरं म्हणजे ही सर्व सरकारची कामे आहेत. मात्र, सरकार स्टेअरिंग कोणाची आणि गाडी कोणाची. बदल्या कोणाच्या यामध्येच घुटमळत आहे. 

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपावर दरेकर यांनी सांगितले की, कोविडच्या प्रश्नावर तर हे सरकार भांबवलेलेच आहे. कोविडबाबत सरकारमध्ये समन्वय आणि नियंत्रण मुळीच नाही, त्यामुळेच कोविड संपूर्ण राज्यात हाताबाहेर गेला आहे. अगदी सुरुवातीच्या काळापासून अजित पवारांनी पुण्यात ठाण मांडून बसायला हवे होते. नियोजन करायला हवे. ठीक आहे, आता बसले तरी ‘देर आये दुरुस्त आये...’ सरकारने गांभीर्याने लक्ष घालून पुण्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्याची गरज आहे. 

Edited By Vijay Dudhale 

Related Stories

No stories found.