मंत्रिमंडळातून नारायण राणेंना मोदी काढू शकतात !

पुणे व नाशिक कोर्टातही त्यांना जामीन मिळेल आणि या सर्व घटनेतून त्यांची निर्दोष मुक्तता होईल .
 मंत्रिमंडळातून नारायण राणेंना मोदी काढू शकतात !
3ulhas_bapat_ff.jpg

पुणे : ''केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक Narayan Rane arrest ही कायदेशीर होती. घटनेनुसार राज्यपाल आणि राष्ट्रपतींना अटक करता येत नाही. केंद्रीय मंत्र्याला अटक होणे यात काही वेगळे नाही, मात्र केंद्रीय मंत्र्याला अटक झाली असल्याने पंतप्रधान त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना मंत्रिमंडळातून काढू शकतात, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय भूमिका घेतात हे पहावं लागेल,'' असे घटनेचे अभ्यासक उल्हास बापट यांनी सांगितलं. 

''पुणे व नाशिक कोर्टातही त्यांना जामीन मिळेल आणि या सर्व घटनेतून त्यांची निर्दोष मुक्तता होईल . यामागे निव्वळ राजकारण आहे,  देशाला स्वातंत्र्य मिळून पंचात्तर वर्ष झाले असले तरीही सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र बसून एक आचार संहिता तयार करावी म्हणजे अशा अडचणी निर्माण होणार नाहीत. कोण कुणाच्या कानशिलात लावणार नाही, त्यासाठी आचारसंहिता अत्यंत गरजेचे आहे,'' असं उल्हास बापट यांनी सांगितलं. 

OBC Reservation : बाजू मांडण्यासाठी केंद्राला हवी तीन आठवड्यांची मुदत
अॅड. असीम सरोदे यांनी न्यायालयानं राणेंना जामीन द्यायला हवा होता, असं म्हटलं आहे. सरोदे यांनी काल फेसबुक पोस्टमध्ये पोलिसांची भूमिका, न्यायालायनं फेटाळलेला जामीन, राणेंना अटक झाल्यास पोलिसांनी घ्यायची दक्षता आदी मुद्यांवर आपलं मत मांडलं आहे. ते म्हणतात, नारायण राणे यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणीची विनंती जरी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली असेल तरीही जेव्हा या प्रकरणी युक्तिवाद होईल तेव्हा नारायण राणेंना जामीन नक्की मिळेल.

ज्या वक्तव्याच्या आधारे व ज्या कलमांच्या खाली राणेंना अटक झाली त्यानुसार विचार केल्यास राणेंना जामीन द्यायला पाहिजे होता, असे मला वाटते पण रत्नागिरी जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळला आहे. गुन्ह्याची खोली (gravity of offence) विचारात घेऊन उच्च न्यायालय नारायण राणेंना काही विशिष्ट अटी व शर्तींच्या आधारे नक्कीच जामीन मान्य करेल. त्यामुळे आज ना उद्या नारायण राणेंना नक्कीच जामीन होईल, असं सरोदे यांनी स्पष्ट केलं आहे. 
 
फुग्याला भोक तुमच्या पडलंय ; चंद्रकांत पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल 

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानाचे Narayan Rane controversy समर्थन केलं होतं. आज सामनाच्या अग्रलेखातून चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
Edited by : Mangesh Mahale 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in