पिंगळी तलावात 'उरमोडीचे पाणी' नक्की कुणामुळे आले?

हे पाणी आणण्यात कोणाला यश आले, याबाबत लोकांत चांगलीच चर्चा सुरू आहे.
पिंगळी तलावात 'उरमोडीचे पाणी' नक्की कुणामुळे आले?

गोंदवले (जि. सातारा) : उरमोडीचे पाणी पिंगळी तलावात आले कुणामुळे या प्रश्‍नावरून सध्या माणमधील कॉंग्रेस व भाजपच्या नेत्यांत श्रेयवाद सुरू आहे. नेत्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पाणी आमच्या नेत्यानेमुळे आले आहे, अशा कमेंट्‌सनी सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. सध्या माण तालुक्‍यात उरमोडीचे पाणी श्रेयवादाच्या राजकारणाने पेटले आहे. 

माण (जि. सातारा) मधील दहिवडी, गोंदवले, पिंगळीसह परिसरातील दुष्काळावर उपाय योजना करण्यासाठी दूरदृष्टी ठेऊन ब्रिटिश सरकारने पिंगळी तलाव बांधला. परंतु पावसाच्या घटत्या प्रमाणामुळे हा तलाव कोरडा पडला आहे. त्यामुळे या परिसरात पाणी टंचाई जाणवू लागल्याने ती सोडविण्यासाठी पाणी उचलून या तलावात आणण्याचा पर्याय उरला. लोकांच्या अनेक वर्षांच्या मागणीबाबत स्थानिक कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे, भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, अनिल देसाई यांनी पुढाकार घेऊन शासन पातळीवर पाठपुरावा केल्याचा दावा केला आहे. आमदार गोरे यांनी वाघमोडेवाडी
येथील सभेत पिंगळीत पाणी मीच आणणार असे वक्तव्य केले होते. त्यानंतर महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंधरा दिवसात पाणी पिंगळी तलावात सोडणार असल्याचे आश्वासन दिले होते. याशिवाय गोंदवलेकर महाराज समाधी मंदिराचे विश्वस्तांचे मुख्यमंत्र्यांशी घरगुती संबंध असल्याने तसाही प्रयत्न सुरू असल्याची चर्चा ऐकायला मिळत होती. 

काल पिंगळी तलावात पाणी कधी येणार या चर्चेला पूर्णविराम मिळाला. उरमोडीचे पाणी किरकसाल बोगद्यातून पिंगळी तलावाकडे मार्गस्थ झाले, अन्‌ राजकीय नेत्यांनी जलपूजन करून पाणी मीच आणल्याचा दावा करण्यास सुरवात केली. सोशल मीडियावर तर नेत्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांत मोठ्याप्रमाणात कमेंट वार सुरू झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in