श्रीमंत पिंपरी पालिकेची कोरोनातही उधळपट्टी; हारतुऱ्यांवर वर्षाला करणार 11 लाख खर्च

बंद शाळांना कोट्यवधी रुपयांचे नवे फर्निचरही खरेदी करण्याचा पालिका कारभाऱ्यांचा विचार चाललेला आहे.
श्रीमंत पिंपरी पालिकेची कोरोनातही उधळपट्टी; हारतुऱ्यांवर वर्षाला करणार 11 लाख खर्च
Pimpri Chinchwad Municipal Corporation will spend Rs 11 crore on programs

पिंपरी : कोरोनामुळे गेले वर्षभर बंद असलेल्या पालिका शाळांत अडीच कोटी रुपयांचे वॉटर फिल्टर बसवण्याचा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (PCMC) सत्ताधारी भाजपचा डाव फेल गेल्यानंतर आता त्यांनी याच बंद शाळांतील मुलांना डायरी देण्याचे ठरविले आहे. ती देऊन ते पालिका शाळांचा दर्जा हा खासगी शाळांसारखा करणार आहेत. तसेच या डायरीमुळे पालिका शाळांतील शैक्षणिक गुणवत्ताही सुधरणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. (Pimpri Chinchwad Municipal Corporation will spend Rs 11 lakh on programs)

बंद शाळांना कोट्यवधी रुपयांचे नवे फर्निचरही खरेदी करण्याचा पालिका कारभाऱ्यांचा विचार चाललेला आहे. ता. २८ एप्रिलच्या स्थायीच्या सभेत वॉटर फिल्टर खरेदीचा विषय दफ्तरी दाखल करण्यात आला. मलईचा हा प्रस्ताव बारगळल्यानंतर आता तसाच एक नाही, तर दोन विषय उद्याच्या (ता. १२) स्थायीच्या  अजेंड्यावर मंजूरीसाठी ठेवण्यात आले आहेत. मात्र, त्यासाठी किती  खर्च येणार, किती डायऱ्या व नेमके काय व किती फर्निचर खरेदी करणार याचा तपशील न देण्याची चतुराई करण्यात आली आहे. 

डायरी देऊन पालिका शाळांचा दर्जा खासगी शाळांसारखा होणार वा करणार असल्याचा तसेच पटसंख्याही यामुळे सुधारणार असल्याचे अजब गणित या डायरी खरेदीच्या प्रस्तावात मांडण्यात आले आहे. कोरोना महामारीत कुठल्या विषयाला प्राधान्य द्यावे, याचे साधे भान सत्ताधाऱ्यांना नसल्याचे यावरून दिसून येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, असे अनेक कोट्यवधी रुपयांचे विषय बिनबोभाट, विनाचर्चा विरोधी सदस्यांच्या सूचक मौनातून याअगोदर स्थायीने मंजूरही केलेले आहेत. पण, सध्या परिस्थिती खूपच बिघडली असून फक्त कोरोना लढ्यालाच  बळ देणारे विषय मान्य करावेत, अशी स्थिती असतानाही असे बिनतातडीचे प्रस्ताव टक्केवारीसाठी फक्त आणले जात असल्याची चर्चा यामुळे सुरु झाली आहे. असाच आणखी एक विषय उद्याच्या स्थायीच्या बैठकीत आहे. 

रेमडीसीवर इंजेक्शन सध्या बाजारात बावीसशे रुपयांना उपलब्ध आहेत. मात्र, ते  तीन हजार रुपये देऊन उत्पादकांकडून थेट खरेदी करण्याऐवजी ते वितरकांकडून खरेदी करण्यात येणार आहेत. या दहा हजार इंजेक्शनसाठी तीन कोटी रुपये खर्च येणार आहे.
 
सध्याच्या महापौर माई ढोरे व याअगोदरचे राहुल जाधव आणि नितीन काळजे यांनी भेट म्हणून पुस्तके देण्याचा, घेण्याचा चांगला पायंडा पाडलेला आहे. त्याला बळ देण्याऐवजी पालिकेच्या विविध कार्यक्रमांतील हारतुऱ्यांवर येत्या दोन वर्षासाठी २३ लाख हजार रुपये पालिका खर्च करणार आहे. म्हणजे वर्षाला साडेअकरा लाख रुपये निव्वळ हारतुऱ्यावर खर्च होणार असल्याने त्याला विरोध होण्याची शक्यता आहे.

Edited By Rajanand More

Related Stories

No stories found.