माझे वेषांतर हे नाटक नसतं.. राजकीयच नव्हे  प्रशासकीयही दबाव असतो! 

कारवाईसाठी धोरण नाही,तर योजना तयार करून तिचा अंमल करतो.
माझे वेषांतर हे नाटक नसतं.. राजकीयच नव्हे  प्रशासकीयही दबाव असतो! 
2krishna_20prakash_0.jpg

पिंपरी : माझे वेषांतर हे नाटक नसते,असे पिंपरी-चिंचवडचे Pimpri-Chinchwad पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश Krishnaprakash यांनी स्पष्ट केले.त्यांनी ५ मे रोजी वेषांतर करून तीन पोलिस ठाण्यांची पाहणी केली होती.त्यावरून हे नाटक असल्याची टीका काहींनी केली होती. ती खोडून काढताना त्यांनी त्यामागील हेतू 'सरकारनामा'ला दिलेल्या मुलाखतीत उलगडून सांगितला.

शहरातील गुन्हेगारीला आळा कसा घातला हे सांगताना कृष्णप्रकाश यांनी जिथे कुठे जातो ते शहर व तेथील परिस्थिती प्रथम जाणून घेतो, असे सांगितले. लोकांत मिसळून माहिती काढतो. अधिकारी नाही, तर पोलिस कर्मचाऱ्यांनाही मित्र करतो. कोण उचापतखोर आहे याची माहिती काढतो. नंतर कारवाईसाठी धोरण नाही,तर योजना तयार करून तिचा अंमल करतो. त्याकरिता योग्य व्यक्तींची निवड करून त्यांना कामाला लावतो,असे ते म्हणाले. काम करताना राजकीयच नाही,तर प्रशासकीयही दबाव असतो. मात्र, खरी माहिती दिली की त्यांची खात्री पटते,असे उत्तर राजकीय दबावाला कसे सामोरे जाता या प्रश्नाला त्यांनी दिले.कुठंच काम करताना मला आव्हान दिसलं नाही, काम अवघड वाटलं नाही. पण, कारवाईनंतर (शासक,प्रशासकांना)स्पष्टीकरण देताना थोडा ताणतणाव येत होता,हे त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केले.वरच्या पातळीवर स्वच्छता राहिली,तर ती खाली झिरपते.वरचाच अधिकारी प्रामाणिक असेल,तर खालचेही तसे राहतात,असे उत्तर हफ्तेखोरी तथा  रेटकार्ड कसे थांबवले या प्रश्नाला त्यांनी दिले.

ज्योतिरादित्य शिंदेंचे आश्वासन अन्‌ नवी मुंबईच्या कृती समितीकडून आंदोलन स्थगित
झीरो टॉलरन्स आणि अवैध धंद्याविरुद्धच्या धडक कारवाईमुळे दुखावलेल्या काही पोलिस अधिकाऱ्यांनी एका राजकीय पक्षाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्याला हाताशी धरून पिंपरी-चिंचवडमधून आयुक्तांची बदली करण्याचा कट  नुकताच समोर आला.त्याबद्दल बोलताना जेथे जाईल तिथे आपल्याविरुद्ध असे काहीना काही कुंभाड रचले जात असल्याने त्याची आता सवयच झाली असल्याचे कृष्णप्रकाश म्हणाले. मुख्य म्हणजे जवळचीच माणसे या षडयंत्रात सामील असतात. पण,प्रशासन असंही असू शकतो, असा विचार निर्माण व्हावा व त्यातून नंतर आलेल्यांना लोकांकडून पूर्वी असं काम होत होतं, अशी विचारणा व्हावी म्हणून मी माझ्या कामाची एक विशिष्ट अशी पद्धत ठरविली असल्याचे त्यांनी सांगितले.

वेळ काढून दररोज व्यायाम करावा,असा फिटनेसचा मूलमंत्र आयपीएसमध्ये सर्वात फिटेस्ट कृष्णप्रकाश यांनी दिला.जेवण जसे आवश्यक आहे, तसा व्यायामही गरजेचा करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण होऊनही कोरोना काळात मुलाखती न झाल्याने पुण्यातील एका तरुणाने आत्महत्या केली.त्यावर तरुणांना कसे मोटीव्हेट कराल, असे विचारले असता कोई भी चीज आखरी और अंत नही है, असे ते म्हणाले.नकारात्मक विचारांना सकारात्मकतेमध्ये बदलण्याचा प्रयत्न करा, खचून जाऊ नका,चिकाटीने काम करत रहा, युपीएससी,एमपीएससी देत असला,तरी बॅकअप म्हणजे पर्याय ठेवा.नागरी सेवेत का जायचे हे निश्चीत झाले असेल आणि त्यासाठीची तत्वे पटत असतील,तरच तो मार्ग निवडा, असा मोलाचा सल्ला त्यांनी स्पर्धा परिक्षेला सामोरे जाणाऱ्यांना दिला आहे.
Edited by : Mangesh Mahale

Related Stories

No stories found.