साठेंचा राजीनामा न स्वीकारताच पिंपरीत काँग्रेसकडून नव्या अध्यक्षांचा शोध

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सचिन साठे यांचा राजीनामा १३ दिवसांनंतरही अद्याप मंजूर झालेला नाही. तरीही या पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती उद्या आयोजित केल्याने तो शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे.
साठेंचा राजीनामा न स्वीकारताच पिंपरीत काँग्रेसकडून नव्या अध्यक्षांचा शोध
PCMC Congress Chief Sachin Sathe Resigns from the post

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सचिन साठे यांचा राजीनामा १३ दिवसांनंतरही अद्याप मंजूर झालेला नाही. तरीही या पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती उद्या आयोजित केल्याने तो शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे.

साठेंच्या राजीनाम्याच्या दुसर्याच दिवशी शहर महिला अध्यक्षांसह पाच पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठी नेहमीच शहर कॉंग्रेला डावलत असल्याचे सांगत सामूहिक राजीनामे दिल्याने पक्षात मोठी खळबळ उडाली. त्यामुळे श्रेष्ठींवर मोठा दबाव आला आहे. या सर्वांचे राजीनामे स्वीकारले तर अगोदरच शहरात तोळामासा प्रक्रुती झालेल्या पक्षाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होणार आहे. कारण शहरात पक्षाचा आमदार,तर सोडा साधा एक नगरसेवक सुद्धा नाही. 

त्यामुळेच नाराज साठेंचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ते राजीनाम्यावर ठाम असल्याने उद्याच्या मुलाखती होत आहेत.मात्र मुलाखतीचा  बहाणा करून राजीनामा दिलेले साठे व पदाधिकार्यांचे मन पुन्हा वळविण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जाणार असल्याचे समजते. त्यासाठी विधानपरिषद सदस्य नाही, पण एखाद्या महामंडळावर घेण्याचे आश्वासन दिले जाण्याची शक्यता आहे.

विधानपरिषदेला डावलण्यात आल्याने सलग गेले दोन टर्म अध्यक्ष असलेले साठे यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना मुंबई येथे ११ तारखेला भेटून दिला.तो विचाराधीन असल्याचे पक्षाचे शहर निरीक्षक व प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांनी आज सरकारनामाला सांगितले. ते आणि दुसरे निरीक्षक शरद आहेर हे उद्या मुलाखती घेणार आहेत. मात्र, नवीन अध्यक्ष उद्या देणार का?तो उद्या जाहीर करणार का? याविषयी स्पष्ट सांगण्यास त्यांनी नकार दिला.
Edited By - Amit Golwalkar


 

Related Stories

No stories found.