बोगस ठराव अन खोट्या सह्या! सरपंचावर गुन्हा दाखल करा, नागमठाणचे ग्रामस्थ चिडले

ग्रामस्थांनी पाठपुरावा करून या व्यायामशाळेचा प्रस्ताव माहितीच्या अधिकारात मागविला असता धक्कादायक बाबी समोर आल्या.
बोगस ठराव अन खोट्या सह्या! सरपंचावर गुन्हा दाखल करा, नागमठाणचे ग्रामस्थ चिडले
Pudhari.jpg

मिरजगाव : ग्रामपंचायतीचे बोगस ठराव व ग्रामसेवकाच्या खोट्या सह्या घेऊन शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करीत नागमठाणच्या (ता. कर्जत) सरपंचाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. (Parner number one in finding covid patients!)

याबाबतचे निवेदनही ग्रामस्थांनी नामदेव शिंदे, काशिनाथ शिंदे, मधुकर शिंदे, उमाजी खुळे, नारायण शिंदे, राहुल खुळे यांनी संबंधितांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, विद्यमान सरपंच व त्यांचे बंधूने त्यांच्या राजमाता अहिल्यादेवी होळकर ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या नावे बोगस कागदपत्रे सादर करून क्रीडा विभागाकडून १० लाखांचा निधी व्यायाम शाळेसाठी घेतला.

याबाबत ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर या संस्थेवर क्रीडा विभागाकडून दंडात्मक कारवाई करून व्याजासह व्यायामशाळेचे अनुदान जमा करून घेतले. दरम्यान, ग्रामस्थांनी पाठपुरावा करून या व्यायामशाळेचा प्रस्ताव माहितीच्या अधिकारात मागविला असता धक्कादायक बाबी समोर आल्या. या व्यायामशाळेसाठी दाखविण्यात आलेली इमारत ही व्यायामशाळा नसून ग्रामपंचायत कार्यालय आहे, ही व्यायामशाळा बांधण्यातच आली नव्हती. प्रस्तावासाठी ग्रामपंचायतचे घेतलेले ठराव बोगस असून त्यावर ग्रामसेवकाच्या खोट्या सह्या आढळून आल्या आहेत. सदर व्यायामशाळेची कोणत्याही प्रकारची नोंद ग्रामपंचायत दप्तरी नाही. दरम्यान, या प्रकाराची चर्चा महाराष्ट्रभर सुरू झाली आहे.

प्रस्तावावर खोट्या सह्या ः ग्रामसेवक

व्यायाम शाळेच्या प्रस्तावावर खोटे शिक्के व खोट्या सह्या केल्या असून व्यायामशाळेचा कोणताही ठराव माझ्या काळात केला नाही. अशा कोणत्याही ठरावाची नोंद दप्तरी नाही. प्रस्तावावरील सह्या खोट्या आहेत.

- माधव गाडेकर, ग्रामसेवक

संबंधित कागदपत्रे खरी ः सरपंच

व्यायाम शाळेचा ग्रामस्थ लाभ घेत नाहीत. त्यामुळे यापूर्वीच अनुदान शासनाला परत केलेले आहे. प्रस्तावासाठी जोडलेली कागदपत्रे खरी आहेत. कोणीही चुकीचा गैरसमज करून घेवू नका.

- देविदास महारनवर, सरपंच नागमठाण

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in