अन्यथा सत्ताधारी-विरोधकांच्या दारात टोमॅटोचा चिखल - अजित नवले

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी किसान सभेचे नेते कॉम्रेड अजित नवले यांनी राज्यातील सत्ताधारी व विरोधकांना आंदोलनाचा इशारा दिला आहे.
ajit nawale.jpg
ajit nawale.jpg

अहमदनगर ः राज्यात अचानक टोमॅटोच्या किमती घसरल्या आहेत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. राज्यातील सत्ताधारी व विरोधक मात्र त्यांच्या राजकारणात व्यस्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन पुन्हा किसान सभा आंदोलनाच्या तयारीत आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी किसान सभेचे नेते कॉम्रेड अजित नवले यांनी राज्यातील सत्ताधारी व विरोधकांना आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नवले म्हणाले, अचानक टोमॅटोचे दर कोसल्यामुळे राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी अत्यंत संकटात सापडलेले आहेत आणि दीनवाण्या अवस्थेत जावून पोचलेले आहेत. लाखो रुपये खर्च केलेला टोमॅटो रस्त्यांवर, ओढ्या-नाल्यांमध्ये आणि बांधावर फेकून देण्याची वेळ ही टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर आलेली आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक कोणाचेही या प्रश्नाकडे लक्ष नाही. मान-अपमान एकमेकांवर चिखलफेक यातच हे सर्व राजकारणी आज व्यस्त आहेत. शेतकऱ्यांबद्दल कोणालाही आस्थानाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांत असंतोष खदखदतो आहे.

हेही वाचा...

राज्य सरकारला आम्ही विनंती करत आहोत की, सरकारने हा खेळ-खंडोबा आता कृपा करून थांबवावा. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना कशा प्रकारे दिलासा देता येईल. यासाठी सहकार विभाग, पणन विभाग आणि कृषी विभागाने एकत्र यावं.

ही आहे मागणी

कोल्डस्टोरेजच्या माध्यमातून हा माल साठविता येईल काय? कर्ज देता येईल काय? अनुदान देऊन शेतकऱ्यांना दिलासा देता येईल काय? आणि प्रक्रिया उद्योगाला बरोबर घेत हा नाशवंत शेतीमालाच्या जतनासाठी काही उपाय करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याबद्दल काही हस्तक्षेप करता येईल काय? यासाठी गांभीर्याने पुढाकार घ्यावा, अशा प्रकारची अपेक्षा व मागणी तीनही विभागांकडून करत आहोत.

आंदोलनाचा इशारा

सरकारने हे केले नाही तर प्रसंगी हा सगळा टोमॅटो शेतकऱ्यांच्या वतीने राज्य सरकारचे मंत्री व विरोधकांच्या दारात टाकण्याचे आंदोलन किसान सभेला हाती घ्यावे लागेल. ही वेळ यावी लागू नये, अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. प्रसंगी शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि तीव्र स्वरूपाचा लढा देतील, असा इशारा सुध्दा किसान सभेकडून देतोय, असे अजित नवले यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in