"योग्य वेळी ठाकरे सरकारचा करेक्ट कार्यक्रम करू" फडणवीसांचा पुर्नउच्चार

महाराष्ट्रातील मंत्र्यांची स्क्रिप्ट तयार करुन केंद्रावर टीका केली आहे.
Sarkarnama Banner - 2021-05-20T100906.246.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-20T100906.246.jpg

मुंबई : भाजपचे नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  Devendra Fadnavis यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर  Uddhav Thackeray निशाणा साधला आहे. "योग्य वेळी आम्ही राज्य सरकारचा करेक्ट कार्यक्रम करू," असं विधान फडणवीस यांनी एका मुलाखतीत केलं आहे.  Opposition leader Devendra Fadnavis criticizes Thackeray government

पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा भाजपला द्या, या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो, असं विधान केलं होतं. देवेंद्र फडणवीसांच्या या विधानानंतर राज्यात ऑपरेशन लोटसचे संकेत देण्यात आले होतं. आता त्यांनी पुन्हा असं व्यक्तव्य केलं आहे. फडणीस म्हणाले, "सध्या आमच लक्ष कोरोना स्थिती कशी आटोक्यात आणता येईल यावर आहे.  मात्र, योग्य वेळी आम्ही राज्य सरकारचा करेक्ट कार्यक्रम करू"

फडणवीस म्हणाले की, कोरोनाच्या दुस-या लाटेसंदर्भात केंद्र सरकार सतत राज्य सरकारला सुचना करत होत, मात्र राज्य सरकारने नियोजन शून्यता दाखवली, त्यामुळे ॲाक्सिजन अभावी अनेकांचा मृत्यू झाला. ॲाक्सिजन प्लॅान्ट वेळेत उभे केले असते तर अनेक रूग्णांचे प्राण वाचवू शकलो असतो.
 
तैाते वादळाच्या नुकसानीबाबत फडणवीस म्हणाले की,  देशातील अनेक राज्यात तैाते वादळामुळे नुकसान केलं आहे. १००० कोटींची मदत गुजरातला करण्यात आली. त्यांच्या प्रेस नोटमध्ये अस देखील सांगितल आहे कि इतर राज्यांना मदत लवकरच मिळणार आहे. इतर कोणत्याही राज्यांनी मदत मिळणार नाही अस म्हटलं नाही, मात्र फक्त महाराष्ट्रातील मंत्र्यांची स्क्रिप्ट तयार करुन केंद्रावर टीका केली आहे.   
 
"मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला फक्त जनतेची फसवणूक करायची आहे. सरकार जर मराठा आरक्षण संदर्भात गंभीर असत तर मागासवर्गीय आयोगाचा अहवालासंदर्भात बाजू मांडण्यास कमी पडलं नसत. आम्ही मजबूत कायदा केला आणि तो टिकवला देखील मात्र, आताच्या राज्य सरकारला ते टिकवता आल नाही," असे फडणवीस म्हणाले.  
 Edited by : Mangesh Mahale 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in